परभणी प्रकरणातील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी
शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
सडक अर्जुनी:- परभणी येथील स्टेशन रोड भागातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयालगत संविधानाची सिमेंटपासून बनविलेली प्रतिकृती असून तिला काचेचे आवरण होते. दि. १० डिसेंबर २०२४ ला एका माथेफिरुने संविधान प्रतिकृतीचे काच फोडून विटंबना केली. त्यामुळे सदर घटनेचा निषेध करीत संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या माथेफिरुवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेल्या सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी (वय – ३५, रा. शंकरनगर, परभणी) या एल. एल. बी. चे शिक्षण घेणाऱ्या युवकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. त्याचप्रमाणे जेष्ठ आंबेडकरवादी कार्यकर्ते विजय वाकोडे यांच्यावर पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल केल्यामुळे त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्यामुळे दु:खद निधन झाले.सदर दोन्हीही मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करुन संबंधित दोषी पोलीस अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.अशी मागणी शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्त कर्मचारी संघटना तालुका सडक अर्जुनीच्या वतीने करण्यात आली असून तसे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना शुक्रवारी (ता. 20) पाठविण्यात आले आहे.
नायब तहसीलदार जगदीश जांभुळकर यांना निवेदन देतांना
अनिल मेश्राम, आर. व्ही. मेश्राम, दिलीप राऊत, अशोक गजभिये, भोजराज रामटेके, शामराव बडोले,प्रा.राजकुमार भगत, आदी उपस्थित होते.

Pingback: buy androxal uk where buy
Pingback: rifaximin quick delivery
Pingback: medicament kamagra pilule pharmacie renouveler
Pingback: discount enclomiphene generic sale
Pingback: buying flexeril cyclobenzaprine cheap usa
Pingback: buy dutasteride generic europe
Pingback: buying gabapentin singapore where to buy
Pingback: ordering fildena generic where to buy
Pingback: how to buy staxyn purchase no prescription
Pingback: cheapest buy itraconazole buy germany
Pingback: ordering avodart buy san francisco
Pingback: pfizer xifaxan price
Pingback: comprar kamagra je v rozporu