General

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जवाबदार असलेल्यांवर कारवाई करा

वंचित बहुजन आघाडीची मागणी: तहसीलदारांना दिले निवेदन

बोडगांव देवी :- दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरील संविधान शिल्पाची मोडतोड करण्यात आली.

परभणी शहरात भारतीय राज्यघटनेच्या प्रतिमा तसेच राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याकरिता आणि पोलिसांच्या कोंबिंग कारवाईत मृत्यू पावलेल्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी च्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन तहसीलदार तहसील कार्यालय अर्जुनी मोर यांच्यामार्फत दिनांक २० डिसेंबर २०२४ ला देण्यात आले.

याप्रकरणी त्वरित चौकशी करण्यात यावी. या प्रकरणात अटक करण्यात आलेला गुन्हेगार हा मानसिक रुग्ण असल्याचे पोलिस विभागाकडून सांगितले जात आहे. हा मानसिक रुग्ण आहे किंवा नाही याची सखोल चौकशी करण्यात यावी. पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

परभणी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक करून पुतळ्यास क्षती पोहोचविण्याचा तसेच पुतळा परिसरात असलेल्या संविधानाची प्रतिकृती तोडफोड करण्याचा प्रयत्न करून मोठा अनुचित प्रकार घडविण्याचा प्रकार होता. म्हणून सदर घटनेचा आम्ही निषेध करीत आहोत.

तसेच एलएलबी च्या परिक्षेला आलेल्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यास पोलिसांनी कोंबिंग कारवाईत निर्दयपणे मारहाण करून त्यास आरोपी केले. जनावरांना पण कोणी एवढ्या निर्देशाने मारहाण करीत नाही तेवढ्या क्रूरपणे पोलिसांनी बऱ्याच लोकांना मारहाण केली. पहिल्या दिवशी प्रचंड मारहाण झालेल्यांना पोलिसांनी मेडिकलसाठी दवाखान्यात घेऊन गेले नाहीत. उलट डॉक्टरांना पोलीस ठाण्यात बोलावून त्या सर्वांचे मेडिकल केले. पोलिसांनी दहशत निर्माण करून आंबेडकरी वस्त्यांमध्ये दोन दिवस हौदोस माजविला. यात सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. एकूणच आंबेडकरी समाज आणि आंबेडकरी चळवळ यांना नेस्तनाभूत करावयाची आहे. यासाठीच त्यांनी पोलिसांना फ्रीहँड दिलेला आहे.

केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पोलिसांच्या कारवाईवर आमचा तसुभरही विश्वास राहिलेला नाही. यासाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तातडीने न्यायालयीन चौकशीची मागणी करीत आहे. सोबतच पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड सह दोषी पोलिसांवर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सदर प्रकरण अधिक चिघळू नये व राज्यव्यापी आंदोलन पसरू नये याकरिता जबाबदार अधिकारी कर्मचारी व जातीयवादी प्रवृत्तीवर त्वरित कार्यवाही करुन आंबेडकरवादी समाजाला न्याय देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसिल कार्यालय अर्जुनी मोर चे तहसीलदार यांच्या मार्फत निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात येत आहे. यावेळी तालुकाध्यक्ष किशोर तागडे वंचित बहुजन आघाडी अर्जुनी मोर, जिल्हा उपाध्यक्ष महादेव सलामे वं. ब. आ. गोंदिया, युवा तालुकाध्यक्ष कैलास इस्कापे वं. ब. आ अर्जुनी मोर, युवा तालुका उपाध्यक्ष दिपेंद्र उके वं. ब. आ अर्जुनी मोर, युवा तालुका महासचिव संदीप नंदागवळी वं. ब. आ अर्जुनी मोर, युवा तालुका महासचिव रोहित रामटेके वं. ब. आ अर्जुनी मोर, युवा तालुका संघटक हर्षपाल लोणारे वं. ब. आ अर्जुनी मोर, युवा तालुका संघटक लोमेश सांगोळे वं. ब. आ अर्जुनी मोर, युवा तालुका संघटक आशिष कांबळे वं. ब. आ अर्जुनी मोर, युवा तालुका प्रसिद्धी प्रमुख विश्वरत्न रामटेके वं. ब आ अर्जुनी मोर, शुभम मेश्राम अर्जुनी मोर, प्रितम राजकुमार टेंभूर्णे करांडली, अक्षय खुशाल कटरे अर्जुनी मोर, धनंजय गोंडाणे अर्जुनी मोर, प्रकाश मनिराम टेंभूर्णे अर्जुनी मोर, अजय नामदेव कुंभरे तावशी व अन्य समाज बांधव उपस्थित होते.