प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना येथे जन आरोग्य समितीची आढावा बैठक संपन्न
प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाक्टी येथे जन आरोग्य समिती आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला तालुका आरोग्य अधिकारी सुकन्या कांबळे, समितीचे सदस्य संदीप कापगते, कुंदा लोगोडे, डॉ. श्वेता कुलकर्णी, डॉ. कुंदन कुलसंगे, डॉ. सुरेंद्र खोब्रागडे, सरपंच डॉ. सचिन डोंगरे, सरपंच लता भेंडारकर, सरिता राजगिरे, पंढरी लोगडे, प्राचार्य राजन बोरकर, काशिनाथ कापसे, तालुका पर्यवेक्षक धुर्वे, शैलेंद्र तिवारी, डॉ. अजिंक्य आंबटकर उपस्थित होते.
बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांचा आढावा घेण्यात आला. कुष्ठरोग तपासणी, कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र योजना राबविण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुलकर्णी यांनी दिली. आरोग्य केंद्रात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला चांगली सेवा देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सौजन्याने वागणूक द्यावी असे लायकराम भेंडारकर यांनी सांगितले.
यावेळी कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांच्या बालकांना उबदार कपड्याचे वाटप जि.प. सदस्य भेंडारकर यांच्या हस्ते करण्यात आले.
बैठकीसाठी कुंडलिक राऊत, इंदिरा मेश्राम, विकास श्रीपात्रे, सीमा जगनाडे, रक्षा श्रीरामे, नरेंद्र गटारे, प्रमोद टांगले, भालचंद झोळे, सुमित्रा शेंद्रे, लता लांजेवार, मंजूषा वडारे, शिल्पा धकाते, सुप्रिया मेश्राम यांनी सहकार्य केले.