पूर्णाकृती पुतळे जपण्यासाठी चळवळी जीवंत ठेवा – मुन्नाभाई नंदागवळी यांचे प्रतिपादन : सिरोली येथे अनावरण सोहळा संपन्न
अर्जुनमोरगाव :
तमाम महाराष्ट्र राज्यात पुरोगामी वैचारिक जीवनाची खूप हाणी होत आहे. आंबेडकरवादी समाजाला याची जाणीव पाहिजे. आंबेडकरवादी समाज जागृत आहे. शिक्षित आहे. पण राजकारणासाठी भटकणारा आहे. अशाप्रकारे चळवळी भटकत आहेत. हे थांबून महामानवांचे पुतळे जपण्यासाठी चळवळी जीवंत ठेवा ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन आंबेडकरवादी साहित्याचे अभ्यासक मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले. ते सिरोली अनावरण सोहळ्याचे मुख्य मार्गदर्शक वक्ते म्हणून बोलत होते.
यावेळी विचार मंचावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणविर यांच्या अध्यक्षतेखाली सत्कारमुर्ती रामकृष्ण शेंडे, प्रमोद मेश्राम, प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. आदे, कुरखेडा, डॉ. भारत लागे, यशवंत सोनटक्के, प्रदीप मस्के पत्रकार, अनिल दहिवले, कविता कापगते, भिमराव खोब्रागडे, यज्ञराज रामटेके, सरपंच नाजूक लसुंते, उपसरपंच सुधीर मेश्राम, मोहन साखरे, सतीश कोसरे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी तथागत भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई आंबेडकर आदी महामानवांच्या प्रतिमांना माला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच महात्मा ज्योतिबा फूले, सावित्रीबाई फुले व रमाबाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळे दान करणारे या सर्व दानदात्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भीमकन्या समुह व जी. प. प्राथमिक शाळा येथील विद्यार्थी यांनी समूह नृत्य सादर केले.
पुढे प्रा. नंदागवळी म्हणाले- समाजाने आता सजग रहावे. मानव, संविधान व शिक्षण धोक्यात आहे. शासन मागासवर्गीयांचे शिक्षण बंद करण्याचे काम करत आहे. याची जाणीव करून प्रत्येकाने आपले कर्तव्य जपावे. असे मार्मिक प्रबोधन केले.
अनावरण सोहळ्याचे प्रास्ताविक रमेश मेश्राम यांनी मांडले, संचालन शुभांगी हुमणे तर आभार श्री. खोब्रागडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी विलास रामटेके, प्रकाश रामटेके, नवनिता मेश्राम, प्रतीमा डोंगरे यांनी सहकार्य केले.