हा देश वाचनालयात जाणाऱ्या माणसांच्या हातात सोपवा – प्रा. युवराज गंगाराम यांचे प्रतिपादन
आपली भाषा ही आपल्या बोली भाषेतून पुढे जाते. मराठी भाषेमूळेच आपली संस्कृती व सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्राने भरारी घेतली आहे. खरे तर मराठी भाषा हे फार कठीण व समृद्ध अशी आहे. या देशातील नागरिकांनी हा देश मंदिराकडे जाणाऱ्या लोकांच्या हातात देऊ नये, तर हा देश वाचनालयात जाणाऱ्या माणसांच्या हातात सोपवावा. तर या देशाचे भविष्य उज्ज्वल ठरेल. असे प्रतिपादन कवी व समीक्षक प्रा. युवराज गंगाराम यांनी केले आहे. ते कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी मंचावर गोदिंयाच्या समाज कल्याण निरीक्षक स्वाती कापसे यांच्या अध्यक्षतेखाली गोदिंया येथील नामवंत कवी व समीक्षक प्रा. युवराज गंगाराम, प्रसिद्ध कवी बापू इलमकर, मुख्याध्यापक रविशंकर इठूले आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी श्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर व सी. वी. रमन यांची जयंतीचे औचित्य साधून जागतिक मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिवस याचे उद्घाटन मान्यवरांनी करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेले विज्ञानाचे प्रयोग व टाकावू पासून टिकाऊ तयार कलादालन याचे अवलोकन करण्यात आले.
सदर कार्यक्रम नंगपुरा-मुर्री येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा याठिकाणी साजरा करण्यात आला. त्यानंतर मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमावेळी महापुरुष राष्ट्रपिता महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करण्यात आली. समई पेटवून दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सन्मान करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थी कवी अमित भोंडेकर, ममीत वालदे, अथर्व शहारे, चेतन चौधरी, समंथ भोवते, रेयांश वालदे, विनय कोल्हे, समीर खोब्रागडे, अनुराग धमगाये, विराट राऊत, प्रेरित बन्सोड, रौनक अंबादे या विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता सादर केली.
पुढे युवराज गंगाराम म्हणाले- मराठी भाषा यावर सखोल अभ्यासपूर्ण भाषेवर प्रकाश टाकला. व्युत्पत्ती, निर्मिती यावर खूप सखोल मार्गदर्शन केले. तसेच कवी बापू इलमकर यांनी कवी व कविता यावर चांगले मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रविशंकर इठूले यांनी केले. तसेच या समग्र कार्यक्रमाचे शास्त्रशुद्ध सुत्रसंचालन कवी व अद्यापक मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले तर शिक्षिका नीता भलमे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप ढवळे, साधना पारधी, अस्मिता तेलंग, कार्तिक शहारे, अर्चना चव्हाण, स
स्वाती राणा, प्रगती खोब्रागडे व तुषार महाजन यांनी सहकार्य केले.