शिवरात्रि निमित लाखो भाविकांची गर्दी, हर हर महादेव च्या गजराने दुमदूमले प्रतापगड
संपूर्ण देशात महाशिवरात्री चा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला असून सर्वत्र भगवान भोलेनाथाचा गजर आपल्याला पाहायला मिळतो. अश्याच प्रकारची वैशिष्ट्य पूर्ण यात्रा गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड किल्यावर दि. 26 फेब्रुवारी रोजी भरली, या यात्रेला लाखो हिंदू व मुस्लिम भाविक संपूर्ण जिल्ह्यातुन नव्हे तर इतर राज्यातून सुद्धा या यात्रेत हजेरी लावत भगवान शंकर तसेच या ठिकाणी सुमारे ३०० वर्षा आधी होऊन गेलेले खाव्जा उस्मान गणी हारूनी यांच्या दर्ग्यावर नतमस्तक होतात. महाशिवरात्रीच्या पर्वावर हिंदू व मुस्लिम बांधव एकत्रित येउन हा सण साजरा करीत असल्यामुळे या ठिकाणचे महत्व दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
यात्रेत आलेल्या भाविकांन करिता नेते मंडळीच्या वतीने ठीक ठिकाणी महाप्रसादचे आयोजन करण्यात आले तर जिल्हा प्रशाशनाच्या वतीने भाविकांन करीता एसटीबस ची सोया करण्यात आली आहे, हि यात्रा घनदाट जंगल भागात भारत असल्याने आणि भगवान शंकराची मूर्ती हि उंच पहाडावर असल्याने भाविकांना कुठलाही त्रास जाणवू नये या साठी आरोग्य विभागाच्या वतीने हेल्थ कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहेत.
पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत इत्तर ही राज्यातील भाविक मोठया संख्येत हजेरी लावत असून हि यात्रा घनदाट जंगल भागात भरत असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त यात्रेत लावण्यात आला आहे. तर ठीक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आह, यावेळी नाना पटोले आमदार, राजकुमार बडोले आमदार, परिणय फुके आमदार, लायकराम भेंडारकर जिल्हा परिषद अध्यक्ष सह अनेक नेते मंडळी उवस्थित होते.