येरंडी गावातील रोवणीला पुरेशा पाणी पुरवठा करा शेतकऱ्यांची मागणी ४० टक्के रोवणी बाकीचं
अर्जुनी मोरगाव :- तालुक्यातील येरंडी या गावात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यासाठी नवेगावबांध जलाशचे पाणी पुरवठा केला जातो. परंतु पाणी हे पुरेसे प्रमाणात न देता कमी प्रमाणात दिले गेले. यामुळे अजूनही ४० टक्के शेतकऱ्यांची रोवणी उर्वरित आहे. त्यामुळे रोवणीला पुरेसे पाणी पुरवठा करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
सदर नवेगावबांध जलाशयाचे पाणी पाच गावांना मोफत दिला जातो. त्यामध्ये येरंडी, देवलगाव, नवेगावबांध, मुंगली व कोहलगाव या पाच गावांना प्रत्येक वर्षी शेतीसाठी मोफत दिला जातो. पण येरंडी हे गाव अर्जुनीमोरगाव मार्गावर असून थोडे लांब आहे. तर मधातील देवलगावचे शेतकरी हे पाणी अडून ठेवल्यामुळे पुढे पाणी पुरेसे पोहचत नाही.
अनेक वेळा पाण्या संदर्भात बैठका व चर्चा करुनही सदर प्रकार हा दरवर्षी होतो. या अडचणीमुळे येरंडीच्या शेतकरी लोकांची रोवणी ही ४० टक्के झाली नाही. तसेच धानपिक हे निसवायला आल्यावर सुद्धा पाणी दिला जात नाही. अशाप्रकारे शेतकरी वर्गाची लावलेली रक्कम ही मिळू शकत नाही. अशात काय कारावे ?
आता तर रोवली झाल्यामुळे अनेक शेत जमीनीला फुट पगल्याचे दिसते आहे. पाणी जर मिळत नसेल तर उन्हाळी लावायला देऊ नये. अशी सुध्दा खंत शेतकरी व्यक्त करतात.
येरंडीहून बाराभाटीकडे पाणी पोहचतच नाही
सदर नवेगावबांध जलाशयाचे पाणी हे उन्हाळी धानपिकाची लागवड केली आहे. तर त्या मार्गावरील कालव्याला पाणी पोहचू देत नाही. अनेक ठिकाणी अडविण्याचे काम काही नागरिक करतात. तर शेतकरी लोकांनी कशी शेती पिकवायची असा प्रश्न उपस्थित होते.