General

जनावरांसाठी कुवाढास नाल्यात बेवरटोला धरणाचे पाणी द्या तहसिलदार यांच्याकडे नागरिकांची मागणी

सालेकसा प्रतिनिधि राजु फुंडे :- उन्हाळ्याचे दिवसाला सुरुवात झाली असून कुवाढास नाल्यातील पाणी आटलेले आहे, त्यामुळे जनावरांना पिण्याचे पाण्यासाठी गैरसोय निर्माण झालेली आहे. मौजा रोंढा, मुरुमटोला, नवाटोला, जुना सालेकसा ,जांभडी, निंबा , आमगावखुर्द, धनसुवा बोरी या गावाच्या जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करण्याकरीता बेवरटोला धरणाचे पाणी सोडून जिवनावश्यक आणि आवश्यक गरज प्राथमिकतेने सोडविण्याच्या उद्देशाने नागरिकांनी तहसिलदार नरसय्या कोंडागुर्ले यांना निवेदना द्वारे मागणी केली. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजू दोनोडे,ओबीसी आघाडी कांग्रेस चे विजय फुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष ब्रजभूषण बैस, हेमंत शर्मा, काँग्रेसचे शहराध्यक्ष निर्दोष साखरे, बाजीराव तरोने, भाजप तालुका उपाध्यक्ष विक्की भाटिया,राजु फुंडे, चिंतामण लिल्हारे शोभाराम शहारे, आशुतोष असाटी, यांची उपस्थिती होती.