विदर्भ

महिलांनी आत्मसन्मान वृद्धिंगत करून आत्मनिर्भर बनावे – लिना प्रधान ग्रा.पं दाभना येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

अर्जुनी मोरगाव :- आताच्या वर्तमान काळामध्ये महिला सर्व क्षेत्रांत दैदिप्यमान आणि उत्कृष्ट कामगिरी करतांना किंबहुना त्यांच्यावर आलेल्या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे व सक्षमपणे सांभाळत आहेत. महिलांनी आपला आत्मसन्मान वृद्धिंगत करण्यासाठी आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सरपंच लिना प्रधान ग्रा.पं दाभना यांनी स्थानिक जागतिक महिला दिनी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन आपले मत व्यक्त केले.

जागतिक महिला दिनानिमित्ताने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय दाभना येथे महिला ध्वजाचे ध्वजारोहन गावातील सामाजिक कार्यकर्त्या सुशिला मानकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महिलांनी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार नाही अशी शपथ घेतली. तसेच आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडे व स्वतःच्या आरोग्याकडे विशेषत्वाने लक्ष देण्याचा निर्धार सुध्दा उपस्थित सर्व महिलांनी केला. कुटुंबाच्या यशात महिलांचे योगदान महत्वपूर्ण असते. सुजाण व कर्तव्यदक्ष महिला या गावविकासाठी आधारस्तंभ आहेत. जागतिक महिला दिनाच्या औचित्ताने सर्व महिलांनी ग्रामसफाई केली.

सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोलिस पाटील सुनंदा शिवणकर, जि.प.शाळा शिक्षिका शामलता नाकाडे, ग्रा.पं.सदस्या कुसुम नेवारे, माजी सरपंच गीता प्रधान, मालता प्रधान, रविंद्रा ताराम, सरीता ब्राम्हणकर, ज्योती धानगाये, मुखरा सूर्यवंशी, प्रतिष्ठित महिला चंद्रभागा राखडे आणि सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्या सूर्यवंशी, जया ताराम, रेवता पिहिदे, दुर्गा ताराम, रेखा ताराम, कल्पना भेंडारकर, शिल्पा प्रधान, सविता तरोणे, नैनीता प्रधान, संगीता राखडे, लक्ष्मी प्रधान यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन ग्रा.पं सदस्या मीना शहारे व आभार निकीता ब्राम्हणकर यांनी मानले.