संविधानाप्रमाणेच प्रत्येक माणसाने महिलांचा सन्मान केला पाहिजे.- नीता भलमे
निवासी शाळेत जागतिक महिला दिन साजरा
गोदिंया :- दररोज पुरुष आणि स्री हे सामाजिक जडणघडणीत दोन रथाचे चाक आहेत. जसा पुरुषप्रधान परंपरा समाजात नांदते तशाच प्रकारे महिलांना सुध्दा तेवढाच सन्मान प्रत्येक माणसांनी करावा. भारताचे संविधानात जो स्रीयांना मान सन्मान आणि आदर केला तोच सन्मान केला पाहिजे. कारण प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. म्हणून संविधानाप्रमाणेच प्रत्येक माणसाने महिलांचा सन्मान केला पाहिजे. असे प्रतिपादन सहाय्यक शिक्षीका नीता भलमे यांनी केले. त्या अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते.
प्रामुख्याने यावेळी मंचावर शिक्षीका नीता भलमे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी अस्मिता तेलंग, साधना पारधी, प्रगती खोब्रागडे, अर्चना चव्हाण, स्वाती राणा, मंजू भोंगाळे, वैशाली माहूरे, मिनाक्षी वासनिक, गीता महावत, लता साखरे, पुजा ज्ञमेश्राम, आदी महिला मंचावर उपस्थित होत्या.
यावेळी प्रसंगी राजमाता जिजाऊ भोसले, शिक्षाच्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, जगाची सांस्कृतिक माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना मालार्पण करण्यात आले. दीपप्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले. मंचावर असणाऱ्या प्रत्येक महिलांना मानाचा फेटा बांधून आणि भेट वस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजक म्हणून प्रास्ताविक मुख्याध्यापक रविशंकर इठूले यांनी केले. तसेच सूत्रसंचालन वर्ग नववीचे विद्यार्थी तुषार साऊस्कार याने केले, तर आभार यश वालदे याने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप ढवळे, मुन्नाभाई नंदागवळी, कार्तिक शहारे, हेमंत लाडे यांनी परिश्रम घेतले.