कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांनी काढला रूट मार्च
सालेकसा :- ग्रामीण व शहर परिसरातील होळी रंगपंचमी या आगामी सणानिमित्त पोलीस स्टेशन परिसरात पोलीस स्टाफ c60 होमगार्ड एस आर पी एफ यांच्यासह रूट मार्च काढण्यात आले. परिसरात परिपूर्ण शांतता व सुव्यवस्था कायम अबाधित राखण्यासाठी सदर रूट मार्च काढण्यात आले. सणासुदीच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना घडू नये व जनतेमध्ये शांतीचा वातावरण निर्माण व्हावे यासाठी पोलीस प्रशासनातर्फे कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सदर रूट मार्च पोलीस स्टेशन परिसरात काढण्यात आले.