कर्तव्यावर असणाऱ्या वनमजुराचा वनव्याच्या आगीत होरपळून मृत्यू..!
अर्जुनी मोरगाव /गोंदिया :- उन्हाळ्याची चाहूल लागताच जंगल परिसरात वनवा लागण्याच्या घटना सहजपणे पाहायला मिळू शकतात मात्र त्या वनव्याची आग विझवताना कर्तव्यावर असणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याचा होरपळून मृत्यू होणे ह्या घटना क्वचितच पाहायला मिळतील. अशीच एक घटना जिल्ह्यातील गोठणगाव रेंज मधील प्रतापगड बीट परिसरातील कंपार्टमेंट 231 आर एफ येथील जंगलात (दि.12 मार्च) रोजी सायंकाळी सहा ते सात वाजे दरम्यान आग लागली होती. ती आग विजावताना वनमजूर देवबल्ली विठोबा बोरकर वय (57) वर्ष रा. दहेगाव माईन तालुका लाखनदूर हे आगीत होरपडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.
या वनव्याचे स्वरूप इतके भीषण होते की ती आग विजवताना नाहक उपस्थित वन मजुराचा मृत्यू झाला. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार यावेळी वन मजुराकडे आग विझवण्यासाठी पुरेशी साधन नसल्यामुळे आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर घटना घडताच मृतक वनमजुरास प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव येथे नेण्यात आले पुढे त्यांना ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे हलवण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर वन मजुरास मृत घोषित केले. पुढे त्यांचे सवविच्छेदन करून अंत्यसंस्कार विधी पार पाडण्यात आला.
देशाच्या सीमेवर लढताना सैनिक, कायदा व सुव्यवस्थेच्या नियंत्रणासाठी लढताना पोलीस वीरगती प्राप्त झाल्यास त्यांना विशेष सन्मान असतो मात्र जंगलाची आग विझवत असताना कर्तव्यावर असलेल्या वनमजुरास वन शहिदाचा दर्जा मिळणार का? असा प्रश्न उपस्थित जनतेकडून केला जात आहे.
मृतकाच्या परिवारास प्राथमिक स्वरूपात 40 हजारापर्यंतची आर्थिक मदत पुरवण्यात आली आहे त्यापुढील शासकीय दांव्या अंतर्गत पुढील कारवाई करण्यात येईल. – अविनाश मेश्राम Acf.