General

बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी

सडक अर्जुनी:- बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या अनुषंगाच्या मागणीचे निवेदन भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्र्पती यांच्याकडे बुधवारी (ता.१२) पाठविण्यात आले.
सम्राट अशोक यांनी इ. स. पूर्व तिसऱ्या सतकात महाविहाराचे बांधकाम केले. तथागत गौतम बुद्धाला ज्या बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे. जगातील बौद्ध अनुयायांचे श्रद्धास्थान असलेले बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौध्दांना सोबत
घेऊन बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे तसेच बुद्धगया महाविहार कायदा सन १९४९ रद्द करण्यात यावे.

या अनुषंगाचे निवेदन भारतीय बौद्ध महासभा तालुका सडक अर्जुनी व वंचित बहुजन आघाडी तालुका सडक अर्जुनी यांच्या वतीने तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांना देण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका अध्यक्षा वर्षा शहारे, जिल्हा संस्था सचिव नीना राऊत, शहर अध्यक्षा चंद्रकांता मेश्राम, सरिता जनबंधू, शिला सूर्यवंशी, रेवाराम मेश्राम, शामराव बडोले,चंदा बडोले, जयश्री बडोले, सरिता जनबंधू तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुखदास मेश्राम, पुरुषोत्तम रामटेके, बाबुलाल बौद्धांश, अशोककुमार लांजेवार, ताराचंद बन्सोड, सुधीर खोब्रागडे, पृथ्वीराज बांबोळे, ओमप्रकाश डोंगरे, आदर्श रामटेके, वीरेंद्र सतदेवे, भास्कर तागडे, उमेश नागदेवे, संजय नागदेवे, अनिल उके, राजूभाऊ मेश्राम आणि इतर पदाधिकारी व
कार्यकर्ते उपस्थित होते.