आंबेडकरी साहित्य संमेलनात मुन्नाभाई नंदागवळी करणार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व..!
दोन दिवसीय साहित्य संमेलन : कवितेची वैशिष्ट्ये मांडणार
अर्जुनी मोरगाव::- तालुक्यातील येरंडी-बाराभाटी येथील रहिवासी प्रसिद्ध कवी मुन्नाभाई नंदागवळी यांची अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संस्कृती व संवर्धन महामंडळ, निळाई आयोजित १६ वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन नागपूर या संमेलनात निमंत्रित कवी म्हणून निवड झाली. ते गोदिंया जिल्ह्यातील युवा आंबेडकरवादी कवी असून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
जिल्ह्यातील युवा तरुण कवी प्रा. मुन्नाभाई नंदागवळी यांनी आतापर्यंत पाच परिवर्तनशील साहित्य संमेलने घेतली आहे. त्यांचे कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांच्या अनेक कविता गाजलेल्या असून अनेक साहित्य संमेलन गाजवली आहेत. गेल्या १५-१७ वर्षापासून ते या क्षेत्रात नावारूपास आले आहे. त्यांची कथा, पत्रकारिता, कलावंत, कविता, लेख, समीक्षा, प्रस्तावना, प्रबोधन तथा मार्गदर्शक अशा अनेक भूमिका पार पाडत आहेत.
ते दोन दिवसीय आंबेडकरी साहित्य संमेलनात कवितेची वैशिष्ट्ये मांडून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. अल्प वयात चांगलीच भरारी घेतल्याचे समजले जाते. आंबेडकरवादी कवितेवर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे पीएच.डी.संशोधन करत आहेत. असा हा प्रवास म्हणजे जिल्ह्याचे गौरवच आहे.
प्रतिनिधित्व करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक कवी, लेखक, साहित्यिकांनी मंगलमय शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.