ग्रामीण पोलिसांनी 82420 रुपयांची दारू केली जप्त
गोंदिया :- अवैध दारू विक्रीच्या रूपथाम करण्याच्या उद्देशाने करत असलेल्या गस्ती दरम्यान अतिशय सीताफिने सेल टॅक्स कॉलनी परिसरात (दि 13 मार्च) रोजी तीन वाजे दरम्यान मिळून आलेल्या आरोपी बलदेव पांडुरंग मेश्राम वय 37 राहणार गिधाडी तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया याच्या मोपेड च्या पायदानात पिशवीत 5700/- किमतीचे रॉयल इस्टेट 6720/- किमतीचे मॅकडोनाल्ड व निळा रंगाची जुपिटर वाहन एम एच 35 एपी 18 78 असे एकूण 82,420/- रुपयाचा माल विनापरवाना अवैधरित्या मिळून आल्याने फिर्यादी सहाय्यक फौजदार ललित रघुनाथ मल्लेवार यांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे अपराध क्रमांक 105/ 2025 कलम 65(ई) 77(अ) म. दां. का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याच्या तपास पोलीस नाईक राजू नागदिवे हे करत आहे.