जागतिक वन दिनानिमित्त केशोरी सहवनक्षेत्र परिसरात वृक्ष लागवड जि.प सदस्य श्रीकांत घाटबांधे यांची प्रमुख उपस्थिती
अर्जुनी मोरगाव :- अन्न सुरक्षा, पोषण आणि उपजिविकेमध्ये जंगलाचे महत्त्व अधोरेखित असून जंगले वाचली तरच मानवाला चांगले अन्न मिळू शकेल, त्यासाठी जंगलांचे संवर्धन व संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने २०१२ मध्ये २१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय वन दिन म्हणून घोषित केला. या दिनानिमित्त सर्व प्रकारच्या वनांचे महत्त्व पटवून दिले जाते.
त्या अनुषंगाने दिनांक २१ मार्च २०२५ रोजी अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या वनपरीक्षेत्र गोठणगांव अंतर्गत केशोरी सहवनक्षेत्र येथील परिसरात जागतिक वन दिवस निमित्य वृक्षारोपण करून जागतिक वन दिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी जि.प सदस्य श्रीकांत घाटबांधे गोंदिया, मच्छिद्र बोरकर, क्षेत्र सहायक एफ. बी.पठाण केशोरी, वनरक्षक एस.व्ही परशुरामकर बिट गवर्रा, वनरक्षक एन.के भैसारे बिट आंबोरा, वनरक्षक डि.एल मुनीश्वर बिट वडेगाव, वनरक्षक जि.एम पटले बिट दोन नागडोह, वनरक्षक ए.पी गवाले बिट एक नागडोह, वनरक्षक व्ही.जी दखणे बिट चार नागडोह, वनरक्षक तृप्ती कोरे बिट केशोरी, वनरक्षक कल्याणी रहिले बिट करांडली वनमजूर विनायक मेंढे प्रामुख्याने उपस्थित होते.