रासायनिक खताचा काळा बाजार सुरु, वाजवीपेक्षा जास्त दराने विक्री जोमात प्रशासन कोमात..!
सालेकसा प्रतिनिधि /राजु फुंडे :- एकीकडे देशाचे प्रधानमंत्री म्हणतात की शेतकऱ्याचे हिताचे प्रश्न व शेतकऱ्यावरील होणारे लुटमार थांबवा तर दुसरीकडे शासनाचे प्रतिनिधी व सरकार शेतकऱ्यांना लुबाडून करण्याचे काम सध्या सुरू आहे मात्र देशाच्या पोशिंदा म्हणून बळीराजा हा आपल्या अहोरात्र मेहनत करून शेतामध्ये काबाडकष्ट करीत आहे व आज देशाच्या पोशिंदा म्हणजे शेतकरी बळीराजा असून सुद्धा त्यांच्याकडूनच आर्थिक लूट केली जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
विशेष म्हणजे दरवर्षी खरीप व रब्बी हंगाम पिक सुद्धा मोठ्या प्रमाणावर असते व रासायनिक खताच्या मोठा काढा बाजार नेहमीच पहावयास मिळत आहे एकीकडे रासायनिक खताचे भाव वाढल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडलेला आहे तर दुसरीकडे शासन निर्णय प्रमाणे युरियाचे दर हे 269 रुपयांनी विकायला पाहिजे तर दुकानदार हे तीनशे ते साडेतीनशे रुपये विक्री युरियाची करत आहेत व बराच खताच् साठा गोडाऊन मध्ये साठवून ठेवल्याने शेतकऱ्याची आर्थिक लूट सुरू आहे तसेच राखण्या सुपरफास्ट या दर प्रति बोरी ची किंमत साडेचारशे रुपये घेऊन शेतकऱ्यांना सुद्धा लुटण्याचे काम सुरूच आहे व सुपरफास्ट राखण्या बोरीमध्ये निकृष्ट दर्जाच्याराखड्या पावडर येत असल्याचेही निदर्शनात आले असून बऱ्याच राखण्या व युरियामध्ये मोठमोठे गडे येऊन शेतकऱ्यांना अधिक दराने विकत आहेत शेतकऱ्यांना खत विकतांनी विक्रेता हे पक्के बिल देत नाही व यामध्ये लोकप्रतिनिधी व वरिष्ठ कृषी विभागाचे अधिकारी सुद्धा कृषी दुकानाला भेटी सुद्धा देत नसल्याचेही प्रकार सध्या सुरू आहे.
सदर युरियाच्या काळाबाजार व इतर औषध वरील किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी बळीराजा हवालदिल झालेला आहे आज प्रत्येक कृषी विषयक वस्तूचे दर वाढल्याने शेती करणे परवडत नाही त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यावर संकट सावटलेले आहे शासन व प्रशासन फक्त मोठमोठे घोषणा करून व मंचावर भाषणे देऊन शेतकऱ्याच्या तोंडातले घास हिसकावण्याचे काम शासनच करीत आहे व याला आशीर्वाद शासनाचेच असून रासायनिक खत विक्रेत्यांनी सैराट झाले आहेत काही ठिकाणी बोगस बियाण्याचेही वापर. सर्रासपणे करण्याचे चित्र सध्या सुरू आहेत शासन प्रशासनाने विशेष लक्ष देऊन खताच्या काळाबाजार थांबवावा व प्रत्येक रासायनिक कृषी केंद्रावर भेट देऊन प्रत्यक्षात शेतकऱ्यांची आर्थिक लूट कमी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा बळीराजा शेतकऱ्यांनी केली आहे.