Generalविदर्भ

दिवाणी व फौजदारी न्यायालय सडक अर्जुनीत २०२५ च्या पहील्या राष्ट्रीय लोक न्यायालयात ९०२८ प्रकरणाचा यशस्वी निपटारा.!!

सडक अर्जुनी.:- मा. ना. उच्च न्यायालय बॉम्बे, मुंबई व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये तालुका विधी सेवा समिती सडक अर्जुनी व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने सडक अर्जुनी न्यायालयात शनिवारी २२ मार्च २०२५ रोजी दिवाणी व फौजदारी प्रलंबित तसेच दाखल पूर्व प्रकरणांचा जलद गतीने निपटारा होण्याकरिता पहील्या राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.

या लोकन्यायालयात एकूण ९०२८ प्रलंबित तसेच दाखलपूर्व प्रकरणाचा निपटारा सामोपचाराने करण्यात आला. यात ७९,७६, ४०७ रुपये वसुली करण्यात आली. उद्घाटन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश डॉ. विक्रम अं. आव्हाड यांच्या संमतीने भारतीय सैन्यदलात कार्य करणाऱ्या सेवानिवृत्त माजी सैनिकाच्या शुभहस्ते लोकन्यायालयाचे अनावरण करण्यात आले . या कार्यक्रमाला गट विकास अधिकारी रविंद्र सानप, पोलीस उप निरी. सरोदे, नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी युगलकुमार दडेमल, सहा. सरकारी अभियोक्ता ओ .एस .गहाने , वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट डी. एस . बनसोड, ज्येष्ठ अधिवक्ता एस. बी. गिरेपुंजे, एडवोकेट ए .एस. राऊत, एडवोकेट व्ही.डी. राहांगडाले, एडवोकेट शंभरकर, एडवोकेट रामटेके तसेच दिवाणी न्यायालय सडक अर्जुनी येथील सर्व कर्मचारी वृंद ,पंचायत समितीचे पदाधिकारी, कर्मचारी, बँक कर्मचारी, म. रा. वि. म. चे कर्मचारी , ग्रामसेवक, पक्षकार व पी. एल .व्ही. उपस्थित होते.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर. एन .जोशी सर ,श्री .ए .एस .प्रतिनिधी सर ,श्री. एम. टी .असीम सर ,श्री. एन. डी. खोसे.सर ,तसेच जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव श्री. एन. के. वाळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित लोक न्यायालयात एकूण ६८ फौजदारी व दिवाणी प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली. तसेच ८९६० दाखल पूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. ज्या पक्षकारांचे वाद सामोपचाराने मिटले त्यांचे गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. दोन दांपत्याचे विस्कळीत संसार पुन्हा सुरळीत करण्यात देखील यश आले. यावेळी न्यायाधीश डॉ.विक्रम अं.आव्हाड यांनी आजकालच्या धकाधकीच्या जीवनात जलद गतीने न्याय मिळण्यासाठी राष्ट्रीय लोकन्यायालय हा अतिशय चांगला पर्याय उपलब्ध असून लोक न्यायालयात मिटलेल्या प्रकरणांमध्ये अपील होत नाही तसेच कोर्ट फी देखील लागत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेऊन जीवनाचा खरा अर्थ साधावा असे आव्हान केले. ही राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी साठी सडक अर्जुनी न्यायालयाचे कर्मचारी, वकील संघ, पंचायत समितीचे पदाधिकारी, कर्मचारी ,ग्रामसेवक, बँक कर्मचारी, एम. एस. सी. बी. चे कर्मचारी तसेच न्यायालयीन पी. एल .वी. यांनी सहकार्य केले.

13 thoughts on “दिवाणी व फौजदारी न्यायालय सडक अर्जुनीत २०२५ च्या पहील्या राष्ट्रीय लोक न्यायालयात ९०२८ प्रकरणाचा यशस्वी निपटारा.!!

Comments are closed.