अपघात

प्रेमाचे प्रतीक असलेल्या सारस पक्षाचे विद्युत तारेच्या शॉकमुळे मृत्यू..!

गोंदिया :- तालुक्यातील माकडी येथील शेत शिवारात विद्युत तारेच्या शॉकमुळे सारस पक्षाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती आज दिनांक 26 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने मृत सारस पक्षाला पशुसंवर्धन विभाग कार्यालय गोंदिया येथे हलविण्यात आले असून मृत सारस पक्षाचे सवविच्छेदन करण्यात येत आहे. सदर पक्षी हा नर प्रजातीचा असून पाच महिने महिन्यापूर्वीच त्याचा जन्म झाला अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ एम मुरुग्णांथम , उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई सहित आधी अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत.