महाराष्ट्

नक्षलग्रस्त भागातील किशोर-किशोरी घेणार महाराष्ट्राचे दर्शन..!

गोंदिया :- जिल्हा पोलीस दल व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, देवरी यांचे सयुक्त विद्यमाने जिल्हयातील जनतेच्या हिताकरीता (विशेषतः नक्षलग्रस्त भागातील जनतेच्या कल्याणा करीता) कायम अग्रेसर राहुन विविध कल्याणकारी नाविण्यपुर्ण उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणुन मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या संकल्पनेतुन आणि मा. श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया (कॅम्प देवरी) यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हयातील नक्षलग्रस्त भागातील किशोरवयीन मुला- मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तसेच त्यांना महाराष्ट्र राज्यात झालेल्या औद्योगिक, आर्थीक, ऐतिहासीक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीची माहिती व्हावी ईत्यादीचे दृष्टीने आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजना अंतर्गत नक्षलग्रस्त भागातील एकुण ४० मुला-मुलींचे एक गट तयार करून त्यांना दिनांक २५ रोजी मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोदिया यांनी बस ला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

तसेच गोंदिया जिल्हा पोलीस दल व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया यांचे समन्वयाने ग्रीन चॅनलद्वारे गोंदिया पोलीस स्कील डेव्हलमेंट सेंटर अंतर्गत एकुण ३० बेरोजगार युवक/युवती यांना रोजगाराची संधी उपलव्ध व्हावी या दृष्टीने दिनांक २५ रोजी पोलीस मुख्यालय, गोंदिया येथे चारचाकी वाहन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे यांचे हस्ते करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात नक्षल सेल गोंदिया येथील पोलीस निरीक्षक श्री. प्रमोंद भातनाते, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे, व पोलीस अंमलदार उपस्थित होते.