रोंडा येथे जिल्हा परिषद शाळेत वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक भेट
सालेकसा :- गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत शैक्षणिक विभाग सालेकसा पंचायत समिती मार्फत ग्रामपंचायत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोंडा येथे (दि. 30 मार्च) रोजी जी.प. शाळा रोंढा येथे देवेंद्र हटीले, उपसरपंच ग्रा.प.रोंढा यांच्या वाढदिवस निम्मित शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन, पेन्सिल विविध साहित्य वाटप केले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे सरपंच नूतनताई हेमराज लिल्हारे ,शाळा व्यस्थापनचे अध्यक्ष व ग्रा.प. सदस्य.संतोष लिल्हारे विशेष अतिथी तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष व शिवसेना तालुका प्रमुख .विजयभाऊ नागपुरे ,पोलिस पाटील ममता शिहोरे,ग्रा.प.सदस्य नूतनभाऊ मेंढे,लक्ष्मी नागपुरे, दुर्गावंती राऊत, प्रमिला बहेकार तसेच सुनील बहेकार व शाळेचे मुख्यध्यापक अंबुले सर, रामटेके सर सर बल्हारे सर, व मेश्राम मॅडम व शाळेचे सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती वयोवृद्ध व महिला पुरुषवर्ग मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी विद्यार्थ्यांना सर्व मान्यवरण कडून मार्गदर्शन करण्यात आले व त्यांना शालेय अभ्यासा सोबत महापुरुषांचे पुस्तक त्यांचा इतिहास वाचण्या करिता सांगण्यात आले. आज घडीला “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” असे म्हणत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात नमूद केले व त्या संविधानाच्या भरोशावर आज सारा देश चालत आहे. आपला वाढदिवस इकडे तिकडे न करता शाळेतच किंवा अंगणवाडी तसेच गरजू नागरिकांना इतरही जीवनावश्यक वस्तू वाटप करावे देवेंद्र हट्टीले यांनी शाळेत विद्यार्थ्यासोबत हितगुज करून संत महापुरुषांच्या विचाराचे पुस्तके वाटप करावे असे आवाहनही रोंडाचे उपसरपंच देवेंद्र हटीले यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सांगितले व आवाहनही केले.