General

दर्जेदार व्हिडिओ मेकिंग स्पर्धेचे तालुकास्तरीय पारितोषिक वितरण संपन्न


तिरोडा :- शैक्षणिक क्षेत्र 2024 – 2025 मध्ये 1 ऑगस्ट 2024 ते 15 नोव्हेंबर 2024 या कालावधीत तालुक्यातील प्रत्येक शाळेतून दर्जेदार व्हिडिओ शिक्षकांनी तयार करून या स्पर्धेमध्ये तयार केलेले व्हिडिओ शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करायचे होते. सदर स्पर्धा विविध गटात इयत्ता पहिली ते दुसरी, तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते दहावी व अकरावी ते बारावी या गटांसाठी विषयानुसार भाषा,गणित, विज्ञान,समाजशास्त्र,पर्यावरण इत्यादी विषयावर व्हिडिओ बनवून स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या शिक्षकांना प्रत्येक गटासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय स्तरावरील पारितोषिक घोषित करण्यात आले या पारितोषिकाच्या स्वरूपात प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह व रुपये 3000, 2000 व 1500 अनुक्रमे याप्रमाणे तालुक्यातून एकूण 44 शिक्षकांना पारितोषिकाचे वितरण जिल्हा परिषद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तिरोडा येथे संपन्न झाले. यावेळी सर्वात जास्त पारितोषिक पटकावणारे शिक्षक श्री वासनिक सर जिल्हा परिषद शाळा भंबोडी यांचे विशेष गौरव करण्यात आला.
बक्षीस वितरण कार्यक्रम विनोदकुमार चौधरी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती तिरोडा यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच दिलीप साकुरे विस्तार अधिकारी, ब्रजेश मिश्रा गट समन्वयक, युपी बिसेन केंद्रप्रमुख, श्री मधुकर ठाकरे केंद्रप्रमुख, श्री रवी भगत तत्कालीन केंद्रप्रमुख , श्री बारेवार श्री देवीदास हरडे साधन व्यक्ती यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रागकुमार ठाकरे साधन व्यक्ती गटसाधन केंद्र तिरोडा तसेच आभार प्रदर्शन प्रतिमा लांडगे साधन व्यक्ती यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री बारेवार,श्रीदेवीदास हरडे, श्री पडोळे यांनी अथक परिश्रम घेतले.

13 thoughts on “दर्जेदार व्हिडिओ मेकिंग स्पर्धेचे तालुकास्तरीय पारितोषिक वितरण संपन्न

Comments are closed.