स्वास्थ

न्यायालयात जागतिक आरोग्य दिनाचे आयोजन

सडक अर्जुनी.:- उच्च न्यायालय मुंबई व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया यांच्या निर्देशान्वेय 7 एप्रिलला तालुका विधी सेवा समिती,सडक अर्जुनी व तालुका वकील संघ, सडक अर्जुनी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त जनजागृतीस्पर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका सेवा समिती चे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड होते.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणीत पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.नितीन पाटील उपस्थित होते. जेष्ठ अधिवक्ता एस.बी.गिरीपुंजे , सहायक सहकारी गहाणे आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम डॉ.प्रदीप पाटील व डॉ. नितीन पाटील यांना न्या.डॉ. विक्रम आव्हाड यांचे हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. नितीन पाटील यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. प्रदीप पाटील यांनी स्वतःचे आरोग्य कशाप्रकारे व्यवस्थित ठेवायचे आणि शासनातर्फे आरोग्य विषयी असलेल्या विविध योजनांचा सामान्य जनतेने कसा लाभ घ्यावा. याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर दिवाणी न्या. डॉ.विक्रम आव्हाड यांनी आरोग्य विषयी कोणकोणत्या काळजी घ्यायला पाहिजे.याविषयी विविध प्रकारची उदाहरणे देऊन जागतिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्शन केले. तसेच शासनाद्वारे ज्या विविध प्रकारच्या योजना मिळतात त्याबाबत विविध उदाहरणे देऊन विस्तृत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला इतर वकील , न्यायालयातील कर्मचारी व पक्षकार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. रिता जगदीश राऊत यांनी केले व आभार लिपिक जे. आर.खान यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी सहायक अधीक्षक ए. जे.लांजेवार, कपिल पिल्लेवान, सौ. डी. एस. खांडेकर , रवी लिमजे,सौ. पी.ए. लांजेवार, अविनाश शेंद्रे, एल डी ठलाल आदींनी सहकार्य केले.