सडक अर्जुनी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
सडक अर्जुनी :- संबोधी बौद्ध विहार समिती सडक अर्जुनीच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती विविध कार्यक्रमाच्या आयोजनासह सडक अर्जुनी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भीम जयंती सोहळ्यानिमित्त संबोधी बौद्ध विहार सकाळी 9 वाजता बुद्ध वंदना घेण्यात आली. व त्यानंतर ध्वजारोहण शिक्षक विलास कोटांगले यांच्या हस्ते करण्यात आले. व बुद्ध वंदना घेण्यात आली.सकाळी 9.30 वाजता प्राध्यापक संतोष रामटेके यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर स्थानिक आंबेडकर वार्ड, पटेल वार्ड आनंद नगर येथे ध्वजारोहण व दुपारी 3 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथून धम्म रॅली चे शुभारंभ करण्यात आला.
ढोल ताशाच्या गजरात निघालेल्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले असून जय भीम ची गुंज निनादत राहिली. तर युवक -युवती व चिमुकल्यासह अनेकांनी रॅलीमध्ये सुंदर डान्स करून भीम जयंती महोत्सवाचा आनंद घेतला. रॅलीमध्ये सहभागी झालेल्यांसाठी तालुक्यातील महावितरण कर्मचाऱ्यांच्या वतीने,तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती.तर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मठ्ठ्याचे वाटप करण्यात आले. भीम जयंती महोत्सवात नगरातील विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्या संघटनांच्या सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. संबोधी बुद्ध विहार येथे रॅलीचे समापन करण्यात आले. त्यानंतर भीम जयंती कार्यक्रमानिमित्त संबोधी बुद्ध विहाराच्या समोरील प्रांगणात रात्री 8 वाजता प्रबोधनकार अमोल राऊत यांचा जल्लोष भिमाचा संगीतमय जाहीर समाज प्रबोधन कार्यक्रमाचे उद्घाटन आपल्या हक्काचा माणूस शिवसेना गोंदिया जिल्हा समन्वयक डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आमदार तथा माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध विहारातील मूर्तीचे पूजन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली .यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सडक अर्जुनी चे नगराध्यक्ष तेजराम मडावी , न .प. उपाध्यक्ष वंदनाताई डोंगरवार, शिक्षक विलास कोटांगले, पं.स. सदस्य अल्लाउद्दीन राजानी, अध्यक्ष विदेश टेंभुर्ने, दिनेश पंचभाई, संस्थापक जितेंद्र मौर्य, नगरपंचायत सभापती शशिकला टेंभुर्णे, नगरसेवक गोपीचंद खेडकर, दीक्षा ताई भगत, देवचंद तरोने , असलेस अंबादे, महेंद्र वंजारी, कामिनी कोवे, प्रशांत बडोले, शिक्षक राऊत, हितेश डोंगरे, आर. व्ही. मेश्राम, सुशील लाडे,ओमप्रकाश टेंभुर्ण, अनिल मुनीश्वर, आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले. व उपस्थित जनसमुदायाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव भाग्यवान शहारे यांनी ,तर संचालन पत्रकार बिरला गणवीर यांनी व आभार उपाध्यक्ष रंजीता मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक व समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संबोधी बुद्ध विहार समितीच्या सर्व पदाधिकरी यांनी सहकार्य केले .