चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून पत्नीची हत्या; आरोपी रावनवाडी पोलिसांसमोर सरेंडर..!
गोंदिया :-जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंभोरा गावात एक धक्कादायक हत्येची घटना घडली आहे.(दि. ८ मे) रोजी रात्री ११ वाजता, आरोपी सुनील मदन पाटले (वय ३५ वर्षे) यांनी आपल्या पत्नीवर कुराडीने हल्ला करत तीला ठार मारले. या क्रूर हत्येमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील पाटले याला आपल्या पत्नीच्या चारित्रावर संशय होता, आणि याच कारणावरून त्यांच्यात वारंवार वाद होऊ लागले होते. ८ मे रोजी रात्री उशिरा ते दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण झाले, ज्यात सुनीलने रागाच्या भरात कुऱ्हाडने पत्नीवर हल्ला केला. या हल्ल्यात ती जागीच मरण पावली.
हत्येची घटना घडल्यावर सुनील पाटलेने घटनास्थळावरून पलायन केले, मात्र त्याने नंतर रावनवाडी पोलिसांसमोर आत्मसर्पण केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर हत्या आणि अन्य आरोपांच्या खाली गुन्हा दाखल केला आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि सुनील पाटलेला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोक व्यक्त केला जात आहे, आणि लोकांच्या मनात ह्या प्रकारच्या अपराधाच्या विरोधात तीव्र नाराजी आहे.