तालुका बौध्द समाज संघ, सडक अर्जुनीची कार्यकारणी गठीत
सडक अर्जुनी:- तालुक्यातील सर्व बौध्द विहार समितीचे पदाधिकारी मिळून तालुका स्तरावर सामाजिक कार्य करण्यासाठी जागेश्वर वैद्य यांचे अध्यक्षेतेखाली संबोधी बुध्द विहार, सडक अर्जुनी येथे नुकतीच सभा घेवून तालुका कार्यकारणीचे गठण करण्यात आले. यामध्ये तालुका बौध्द समाज संघाचे तालुका अध्यक्ष म्हणून महेंद्र दिनदयाल चंद्रिकापुरे, उपाध्यक्ष, न.प.स/अर्जुनी क्षेत्र भाग्यवान पिसाराम शहारे, उपाध्यक्ष जि.प. सौदड क्षेत्र आशिष चंद्रशेखर राऊत, उपाध्यक्ष जि.प. चिखली क्षेत्र मुन्ना गोविंदा देशपांडे, उपाध्यक्ष जि.प. डव्वा क्षेत्र हंसराज पुलिचंद राऊत, उपाध्यक्ष जि.प. शेंडा क्षेत्र संजय तुकाराम बंसोड, उपाध्यक्ष, जि.प. पांढरी क्षेत्र राजरत्न रतिराम मेश्राम, सचिव रोहित भोजराज जनबंधू, सहसचिव-पुरूषोत्तम शंकर रामटेके, कोषाध्यक्ष अमोल हेमंत
राऊत सदस्य-सुबोध मधुकर फुले, भूपेंद्र पिरम शेंडे, मिलींद आडकू मेश्राम, वीरेंद्र जगन्नाथ सतदेवे, मनिषा शहारे, चंद्रकांता सुखदास मेश्राम, दीक्षा मुनिंद्र भोवते, हर्निला नंदागवळी, वैशाली राजेश लांडगे, मंदा अंबादे तर मार्गदर्शक म्हणून नंदकिशोर वैद्य, भोजराज रामटेके, अशोक लांजेवार, प्रा. संतोष रामटेके, सुखदास मेश्राम, आर.व्ही. मेश्राम, जागेश्वर वैद्य, विदेश टेभुर्णे, अनिल मेश्राम, हिरालाल गजभिये, बालचंद मोटघरे, शिवदास साखरे आदींचा समावेश आहे.