साहित्य

“फुले” चित्रपट पाहण्यासाठी अपार गर्दी – “महात्मा” पदवी बहाल दिनी सर्व वर्ग समुदायातील 400 अनुयायांनी ज्योतिबा सावित्रीला वाहिली श्रद्धांजलि 

गोंदिया- ११ मे १८८८ रोजी मुंबईतील मांडवी कोळीवाडा येथे असलेल्या वडगांव गादी रघुनाथ अर्थात रघुनाथ महाराज सभागृह मध्ये झालेल्या कार्यक्रमात मुंबईतील कष्टकरी जनतेच्यावतीने जोतीराव फुलेंना ” महात्मा” पदवी प्रदान केली होती. त्याचे स्मरण म्हणून जिल्ह्यातील संविधान मैत्री संघ, सर्वसमाज विचार मंच आणि मूवमेंट 21 ग्रुप तर्फे दिनांक 11 में ला ” फुले ” चित्रपटाचा चैरिटी शो दुपारी 12 वाजता जनतेला दाखविण्यात आला.

 

19 व्या शतकात मध्ये पारतंत्र्यात व विषमतावादी वातावरणात राहुन सुद्धा विपरीत परिस्थितीत ज्या प्रमाणे महात्मा फुले सावित्री माई फुले फातिमा शेख यानी शिक्षण क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली त्यांचा आदर्श प्रत्येक व्यक्तीने आपल्या जगण्यातून आणि वागण्यातून समाजाला दिला पाहिजे.

फूले चित्रपट प्रदर्शित होत असताना आजही २१व्या शतकात अनेक स्तरावर फूले दाम्पत्यांच्या विचारांचा विरोध होताना दिसत आहे. जो काळ स्वतः फूले दाम्पत्याने अनुभवला त्याचा विचार करणे भयावह वाटणारे आहे. फूले चित्रपटाचा प्रत्येक दृष्य मण कोरून पाझर फोडणारा आहे. फूले हा निव्वळ चित्रपट नसुन समतेची चळवळ आहे.

सर्वसमाज विचार मंच-

शिक्षण बचाव समन्वय समिति, संविधान मैत्री संघ, मूवमेंट 21, ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवा संघ, ओबीसी युवा अधिकार मंच, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, समता सैनिक दल बुद्धविहार महिला मंडळ, भारत मुक्ति मोर्चा, युवा ग्रॅज्युएट फोरम, स्टूडेंट राईटस एसोसिएशन, ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ, संघर्ष वाहिनी, सत्यशोधक विचार मंच, नेशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन, अवामें मुस्लिम कमेटी.