शैक्षणिक

रत्नदीप विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची ‘नीलकमल स्मृती गुणवत्ता’ पुरस्कारासाठी निवड

सडक अर्जुनी.:- चिखली येथील रत्नदीप विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची ‘नीलकमल स्मृती गुणवत्ता’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मार्च २०२५ मध्ये झालेल्या

इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रवीण्यासह विद्यालयातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या विद्यार्थ्यांची सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रथम कु.प्रिन्सि ज्ञानेश्वर साखरे, द्वितीय
भूमेश्वर पुष्पकुमार झंझाड व तृतीय कु.वर्षा देवराम तरोणे या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
पुढील होणाऱ्या शालेय कार्यक्रमामध्ये सेवानिवृत्त शिक्षक तथा नीलकमल स्मृती फॉउंडेशनचे आयोजक आर. व्ही. मेश्राम व आयोजिका प्रज्ञा मेश्राम
यांच्या तर्फे सदर विद्यार्थ्यांना ‘नीलकमल स्मृती गुणवत्ता’ पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात येणार आहे. सदर पुरस्कारासाठी निवड झालेल्या
विद्यार्थ्यांचे आयोजक आर. व्ही. मेश्राम, आयोजिका प्रज्ञा मेश्राम, मुख्याध्यापक एल. एम. पातोडे, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
उल्लेखनीय म्हणजे, सेवानिवृत्त शिक्षक आर. व्ही. मेश्राम यांच्या मुलाच्या स्मृती प्रीत्यर्थ विद्यार्थ्यांना ‘नीलकमल स्मृती गुणवत्ता’ पुरस्काराने गौरविण्यात येत असून सदर उपक्रम सन २००४ पासून अविरत सुरु आहे.

13 thoughts on “रत्नदीप विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची ‘नीलकमल स्मृती गुणवत्ता’ पुरस्कारासाठी निवड

Comments are closed.