कर्तव्यावर जात असताना महिला एसटी कंडक्टरला ट्रॅक्टरची धडक; गंभीर जखमी, आरोपी फरार
तुमसर, २५ मे: भंडारा-गोंदिया सीमेवरील नवेगाव-एलोरा रस्त्यावर शुक्रवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एसटी महामंडळाच्या महिला कंडक्टरला जीवघेणा फटका बसला. कर्तव्यावर जात असताना भरधाव वेगातील रेतीच्या ट्रॅक्टरने त्यांना धडक दिली आणि सुमारे १५ फूट फरफटत नेले. या धक्कादायक घटनेनंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेकंडक्टर ममता पेशने (४५, रा. नवेगाव मनोरा, ता. तिरोडा) या तिरोडा एसटी डेपोमध्ये वाहक पदावर कार्यरत आहेत. त्या शुक्रवारी सकाळी ९.४५ वाजता ड्युटीसाठी दुचाकीवरून निघाल्या असताना नवेगाव-एलोरा पेपर मिल मार्गावर भरधाव ट्रॅक्टरने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर त्या दुचाकीसह रस्त्यावर पडल्या आणि ट्रॅक्टरच्या ओझ्याखाली सुमारे १० ते १५ फूट फरफटत गेल्या.
स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तात्काळ मदत केली आणि ममता यांना उपचारासाठी भंडारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहेत.
अवैध रेती वाहतूकचा बेजबाबदार चेहरा उजेडात
या अपघातामुळे नवेगाव-एलोरा मार्गावरील अवैध रेती वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वैनगंगा नदीकाठावरून होणारी रेती चोरी आणि ट्रॅक्टरचालकांचे बेदरकार वाहनचालक धोका निर्माण करत आहेत. या मार्गावरून दररोज अवैध ट्रॅक्टरफेऱ्या सुरू असून, स्थानिक नागरिकांचे आणि प्रवाशांचे जीवन धोक्यात आले आहे.
दोषींवर कारवाईची मागणी
हा अपघात केवळ निष्काळजीपणाचा परिणाम नसून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडलेली गंभीर घटना आहे. ट्रॅक्टर चालक अद्यापही फरार असून, पोलीस तपास सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि एसटी कर्मचारी संघटनांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Pingback: how to order enclomiphene generic drug india
Pingback: kamagra sans ordonnance
Pingback: order androxal canada internet
Pingback: cheapest buy flexeril cyclobenzaprine generic buy online
Pingback: online order dutasteride generic uae
Pingback: buying gabapentin united kingdom
Pingback: get fildena cheap to buy online
Pingback: buying itraconazole generic online buy
Pingback: low price avodart
Pingback: where to buy staxyn no prescription no fees
Pingback: buy rifaximin no rx needed
Pingback: get xifaxan price dubai
Pingback: kamagra generické