धावत्या मेट्रोमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे कलादर्शन: राष्ट्रपतींची रांगोळी, बिरसा मुंडा यांची प्रतिकृती आणि महिला अधिकाऱ्यांच्या हातावर मेहंदी!
या उपक्रमाचा भाग म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत १ ते ३१ मे दरम्यान उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बौद्धिक आणि शारीरिक विकासाला चालना देणाऱ्या विविध उपक्रमांचा समावेश असून, त्याचाच भाग म्हणून नागपूर मेट्रोचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.
विद्यार्थ्यांनी समर कॅम्पमध्ये शिकलेल्या कलांचे सादरीकरण मेट्रोच्या प्रवासात केले. विशेष म्हणजे या कलाकृती केवळ देखण्या नव्हत्या, तर त्यांनी आपल्या सामाजिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचे दर्शनही घडवले. यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते रांगोळीतील राष्ट्रपती महोदयांचे चित्रण आणि भगवान बिरसा मुंडा यांची मातीपासून घडवलेली प्रतिमा.
या वेळी विद्यार्थ्यांसोबत अनेक मान्यवर अधिकारी देखील उपस्थित होते. अपर आयुक्त आयुषी सिंग (IAS), उपायुक्त दिगांबर चव्हाण, प्रकल्प अधिकारी उमेश काशिद (देवरी), नितीन इसोकर (नागपूर), सहाय्यक प्रकल्प अधिकारी झाडे, सोनावणे, भुसारी, कपिल शर्मा, मेश्राम, प्रमुख शिक्षक खेडकर इत्यादींनी विद्यार्थ्यांबरोबर मेट्रोमध्ये प्रवास करत संवाद साधला.
मेट्रोमध्ये संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी गाण्यांचे सादरीकरण करत प्रवाशांचे मन जिंकले. महिला अधिकाऱ्यांच्या हातावर चालत्या मेट्रोमध्ये विद्यार्थिनींनी मेहंदी रेखाटल्याने वातावरणात उत्साहाचे भरते आले होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच्या मेट्रो अनुभवाचा आनंद स्पष्ट दिसून येत होता.
या समर कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना ॲथलेटिक्स, संगीत, गोंडी चित्रकला, क्ले आर्ट, बांबू आर्ट, मेहंदी, रांगोळी, नाशिक ढोल, आर्चरी, बुद्धिबळ, योगा इत्यादींचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
मेट्रो प्रवासानंतर विद्यार्थ्यांनी रमण विज्ञान केंद्रालाही भेट दिली. यामध्ये त्यांनी 3D शोचा अनुभव घेतला, सौर तारामंडळात खगोलशास्त्राची ओळख करून घेतली, तसेच दैनंदिन जीवनातील घटनांमागील विज्ञान समजून घेतले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण झाली असून तर्कशुद्ध विचार करण्यास त्यांना प्रेरणा मिळाली.
या एकदिवसीय दौऱ्याच्या शेवटी, विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृतींचे आणि हस्तकौशल्याचे प्रदर्शन पाहून अपर आयुक्त आयुषी सिंग यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. त्यांनी बांबूपासून तयार केलेल्या वस्तू, गोंडी पेंटिंग, रांगोळी, मेहंदी आणि क्ले आर्ट्स पाहताना आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, “आदिवासी मुलेही कुठेही कमी नाहीत, केवळ संधी आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.”
या उपक्रमाचे आयोजन करण्यामागे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची प्रेरणा आणि सचिव विजय वाघमारे व आयुक्त लीना बनसोड यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्याच सूचनेनुसार आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून उन्हाळी शिबिर आणि अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले.
नागपूर मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी संदीप शेंडे आणि रमण विज्ञान केंद्राचे पुल्लिंवार सर यांचे या उपक्रमात मोलाचे योगदान राहिले. देवरी प्रकल्पातील प्रशिक्षक, प्रोग्रेसिव्ह कला विद्यालयाचे शिक्षक, तसेच शिक्षकवर्ग आणि कर्मचारी – निलेश राठोड, दिपेश मांडे, हटवार मोहनकर, फुंडे मॅडम, प्रफुल्ल बडोले इत्यादींनी मुलांच्या तयारीत महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांनी सांगितले की,
“या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ नवा अनुभव मिळाला नाही, तर त्यांच्या आत्मविश्वासात मोठी भर पडली आहे. आदिवासी पालकांनीही आपल्या मुलांना या आश्रमशाळांमध्ये दाखल करून त्यांना विविध अंगांनी घडवण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात येते.”
या उपक्रमातून स्पष्ट झाले की, आदिवासी समाजातील मुलेही योग्य संधी दिल्यास उत्तुंग भरारी घेऊ शकतात. आजच्या या दौऱ्याने त्यांचे भविष्य उज्वल करण्याचा एक नवा मार्ग मोकळा केला आहे.

Pingback: how to buy enclomiphene purchase in the uk
Pingback: livraison pas cher kamagra nuit
Pingback: cheapest buy androxal cheap usa
Pingback: order dutasteride generic pharmacy in canada
Pingback: purchase flexeril cyclobenzaprine purchase generic
Pingback: canadian gabapentin diet pills without prescription
Pingback: buying fildena in mexico
Pingback: purchase itraconazole purchase australia
Pingback: how do you get staxyn
Pingback: online order avodart buy japan
Pingback: how to order xifaxan price generic
Pingback: buy rifaximin generic overnight shipping
Pingback: žádný předpis kamagra příští den