आयुष्यमान आरोग्य मंदिर वडेगाव/स्टेशन येथे किशोरवयीन मुलींना मासिक पाळी स्वच्छता विषयी मार्गदर्शन
गोंदिया :- दि.28 मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो. हा दिवस मासिक पाळी आणि त्या संबंधित स्वच्छतेच्या महत्त्वावर जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी, मासिक पाळीच्या काळात किशोरवयीन मुली व महिलांना होणाऱ्या समस्या आणि स्वच्छतेचे महत्त्व यावर चर्चा करुन जनजागृती करण्यात येत असते. त्याचाच एक भाग म्हणुन अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोरंभीटोला अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदीर वडेगाव/स्टेशन येथे अंगणवाडीत किशोरवयीन मुलींना मासिक पाळी स्वच्छता, सॅनिटरी पँड, संतुलीत आहार यावर समुपदेशन करण्यात आले. सोबतच किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबीन, सिकलसेल, थॉयराईड बाबत मोफत रक्त तपासणी करण्यात आल्याची माहीती आयुष्मान आरोग्य मंदीर वडेगाव/स्टेशनचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.निखील लंजे यांनी आजच्या दिनी दिली आहे.

सदर समुपदेशन व तपासणी कार्यक्रमात उपकेंद्र वडेगाव/स्टेशनचे आरोग्य सेविका पायल बनकर,आशा सेविका सुष्मा बडोले, अंगणवाडी सेविका आरती शहारे, लँब तत्रंज्ञ प्रणिता शहारे यांनी आरोग्य सेवा दिली.
किशोरवयीन मुली आणि महिलांनी मासिक पाळी दरम्यान संसर्ग टाळण्यासाठी दर 3 ते 4 तासांनी सॅनिटरी पॅड बदलले पाहिजेत.मासिक पाळीच्या उत्पादनांना हाताळण्यापूर्वी आणि नंतर हात स्वच्छ धुवावेत.जळजळ आणि पुरळ टाळण्यासाठी स्वच्छ, सुती अतर्वस्त्रांची निवड करणे.जर पुन्हा वापरता येणारे कापडाचे पॅड वापरत असाल तर ते व्यवस्थित स्वच्छ धुवा, वाळवा आणि मगच वापरा.नियमितपणे आंघोळ करा आणि जननेंद्रियाचा भाग पाण्याने स्वच्छ करा, तीव्र रसायनांचा समावेश असलेली उत्पादने वापरणे टाळा. योग्य हायड्रेशन आणि संतुलित आहाराचे सेवन करा आणि वापरलेल्या उत्पादनांची योग्य विल्हेवाट लावा. या महत्त्वाच्या टिप्सचे पालन केल्यास निश्चितच मासिक पाळीच्या काळात चांगली स्वच्छता बाळगु शकाल अशी माहीती समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.निखील लंजे यांनी आजच्या दिनी दिली आहे.
मासिक पाळी दरम्यान रक्तस्त्राव कमी असल्यासही रात्रीच्या वेळेस पॅड बदलणं गरजेचं आहे. कारण रात्रभर पॅड आपल्या त्वचेच्या संपर्कात असतो. यामुळे सूक्ष्म जीवजंतूंमळे संसर्ग होण्याची शक्यता असते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आधी पॅड काढावे.नीट एका पेपरमध्ये ते गुंडाळून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. पॅड न बदलताच अन्य कामामध्ये स्वतःला गुंतवण्याची चूक करू नका.आपल्या आरोग्यापेक्षा दुसरे काहीही महत्त्वाचे नसल्याचे आरोग्य सेविका पायल बनकर यांनी माहीती दिली.

Pingback: purchase androxal online from canada
Pingback: online order enclomiphene non prescription online
Pingback: buying rifaximin usa where to buy
Pingback: cheapest buy xifaxan australia to buy
Pingback: how to buy staxyn cost effectiveness
Pingback: how to buy avodart generic online cheapest
Pingback: purchase dutasteride for sale usa
Pingback: discount flexeril cyclobenzaprine generic prices
Pingback: cheap gabapentin purchase from canada
Pingback: how to order fildena generic new zealand
Pingback: buy itraconazole cheap prescription
Pingback: kamagra přes noc online
Pingback: est au kamagra au canada