सामाजिक

सडक अर्जुनी येथे संविधान प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सडक अर्जुनी. :- येथे दिनांक 15 जुलै रोजी तालुका बौध्द समाज संघ सडक अर्जुनी आणि संविधान जागर अभियान यांच्या संयुक्त वतीने एक दिवसीय संविधान जागर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. सुरूवातीला दीप प्रज्वलन आणि संविधान उद्देशीकेचे सामुहिक वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. स्मिता शेंडे, नागपूर, स्वप्नील फुसे, नागपूर, ॲड. जितेंद्र वेडेकर, नितीन सदावर्ते, नागपूर व श्रद्धा राजेंद्र, पुणे, यांनी विविध खेळ व गीतांच्या माध्यमातून संविधानाचे आपल्या जीवनातील महत्व अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले, यामध्ये पहिल्या सत्रात ‘संविधानाची उद्देशिका’ या विषयावर स्वप्नील फुसे यांनी उद्देशिकेतील प्रत्येक शब्दाचा अर्थ व त्याचे महत्त्व समजावून सांगितले. दुसऱ्या सत्रात ‘संविधानाचे यश’ या विषयावर ॲड. वेडेकर यांनी संविधानाने शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, मजूर, नोकरी करणारे यांना काय दिले याचे महत्त्व विषद केले. तिसऱ्या सत्रात ‘ महिला आणि भारतीय संविधान ‘ या विषयावर डॉ . स्मिता शेंडे यांनी संविधानाने महिलाना दिलेल्या अधिकाराबाबत माहिती दिली, तर चौथ्या सत्रात संत, स्वराज्य आणि संविधान’ या विषयावर श्रद्धा यांनी संतानी शेकडो वर्षांपूर्वी त्या काळात सांगितलेले विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात कायद्याच्या स्वरूपात कसे घेतले याविषयी माहिती दिली. शिबिरास ८० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते, शिबिराच्या यशस्वितेसाठी तालुका बौध्द समाज संघटनेचे सर्व मार्गदर्शक व पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

महेंद्र चंद्रिकापूरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून संचालन केले तर आभार स्वप्नील फुसे यांनी मानले.

13 thoughts on “सडक अर्जुनी येथे संविधान प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Comments are closed.