मध्यरात्री गरोदर महिलेवर केला काठीने वार, आरोपी अद्याप मोकाट तरीही गुन्हा दाखल नाही, रावणवाडी पोलिसांची कामगिरी..!
राज डाहाट/गोंदिया :- सणासुदीच्या वेळी समाजात प्रेम व आनंदाने सर्व समूहाचे लोक सण साजरा करतात. अशावेळी आपसातली मत भिन्नता विसरून गुण्यागोविंदाने सणासुदीचा आनंद घेत आदर्श समाजाचा परिचय देतात. मात्र अशावेळी काही समाजकंटक जातीय द्वेषाच्या आधारे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अशी घटना पोलीस स्टेशन रावणवाडीच्या हद्दीत (दि. 16 जुलै) रोजी रात्री साडेअकरा वाजे दरम्यान घडली.
याबाबत सविस्तर असे की, फिर्यादी नरेश रा. रावणवाडी हा येथील स्थानिक त्रिमूर्ती चौकात चायनीज फूड विक्रीचा व्यवसाय करतो. तो दुकान बंद करून आपल्या घराच्या दिशेने निघाला असता एका पान टपरीवर गावातीलच व्यक्तीशी चर्चा झाल्या त्या दरम्यान असे काय घडले की, घरी पोहोचताच त्याच्या मागोमाग गाव परिसरातील सहा ते आठ लोक लाठ्या काठ्या घेऊन त्याच्या घरावर हल्ला चढवला. या हल्ल्यात नरेशच्या डोक्याला दुखापत होऊन तो गंभीर जखमी झाला. त्याला वाचवण्यासाठी पुढाकार घेत असलेली त्याची पत्नी,वहिनी जी गरोदर आहे व 70 वर्षीय त्याची आई ही देखील त्याच्या बचावासाठी पुढे आली मात्र आरोपींनी कोणतीही पर्वा न करता त्यांच्यावरही हल्ला केला. यावेळी चपळता दाखवत घरच्या लोकांनी गेट बंद करून ताला लावला तरीही लाठ्या काठ्यांनी सुसज्ज असलेल्या हल्लेखोरांनी गेटवर सुद्धा लाठ्या बसवल्या तसेच जोरदार शिवीगाळ करत ” इसके बाद तू गाव मे दुकान कैसे चलता है तो देख लेंगे “ असा धमकी वजा इशारा दिला. याप्रकरणी हल्लेखोरांच्या मनातला उद्देश नक्कीच लक्षात येतो. सदर घटनेत एखादी अप्रिय घटना घडली असती तर…! काय घडले असते हे न सांगितलेलेच बरे! यावेळी फिर्यादी नरेशचा भाऊ हा घरी नसल्यामुळे पीडित नरेशचा परिवार हा अत्यंत भीतीदायक वातावरणात हळहळ व्यक्त करत होता. घरातील छोटी मुले सैरावैरा पळत होती.या घटनेची चित्रफीत समाज माध्यमांवर चांगलीच वायरल होत आहे.
या घटनेची दखल दिनांक 17 जुलै रोजी पोलीस स्टेशन रावणवाडी येथे घेण्यात आली त्यामध्ये सदर गुन्हा हा अदखलपात्र असल्याचे स्टेशन डायरी अमलदाराने तशी पावती दिली.
यावर फिर्यादी नरेशचे समाधान न झाल्याने त्यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. नरेशची फिर्याद ऐकून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधित पोलीस निरीक्षक वैभव पवार यांना पुढील कारवाई करण्यास आदेशित केले. मात्र आज घडीला जवळजवळ पंधरा दिवस उलटून देखील सर्व आरोपी मोकाट फिरत असल्याची चर्चा संपूर्ण परिसरात होत आहे.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षा पोहोचवण्याच्या दृष्टीने थाटामाटात उभारण्यात आलेले पोलीस स्टेशन अशावेळी काय भूमिका निभावते याचे याचा चांगलाच परिचय गावकऱ्यांना आला व परिसरातील लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला.
पीडितांचे अनुभव –
फिर्याद घेऊन आलेल्या अनेक पीडितांचा असा अनुभव आहे की, फिर्याद योग्यरीत्या न ऐकता आपल्याच मर्जीप्रमाणे विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे कथन अनेक पीडितांनी सांगितले.
विसर पडलेले कर्तव्य –
याशिवाय रस्त्यावर अवैधपणे चाललेले दारूचे दुकान, चौका चौकात राजरोसपणे चालत असलेले सट्टा मटक्याचे अड्डे, अवैध वाहतूक आदी अनेक प्रकारचे कामधंद्यांमुळे गावात अशांततेचा वातावरण असून गुन्हेगारी प्रवृत्तींना पोषक असे बनवून ठेवलेले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था नांदेल का..? या घटनेमुळे पोलीस विभागाची प्रतिमा पुन्हा ऐरणीवर आल्याची चर्चा होत आहे इतकेच..

Pingback: kamagra livraison le lendemain pas cher
Pingback: discount enclomiphene buy mastercard
Pingback: buying androxal australia purchase
Pingback: how to order flexeril cyclobenzaprine generic uk buy
Pingback: cheapest buy dutasteride generic side effect
Pingback: buy cheap gabapentin australia suppliers
Pingback: where to buy cheap fildena no prescription
Pingback: how to buy itraconazole cheap alternatives
Pingback: canadian pharmacy online staxyn
Pingback: buy avodart australia purchase
Pingback: buy cheap rifaximin no prescription
Pingback: ordering xifaxan usa suppliers
Pingback: cena kamagra