अदानी फाउंडेशनचा २९ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा
विविध उपक्रमांचे आयोजन
पर्यावरण आणि वृक्षारोपण: ‘हरित पर्यावरण की एक पहल’ या कार्यक्रमांतर्गत, ६ ऑगस्ट रोजी कवलेवाडा, मेहंदीपूर आणि बरबसपुरा या गावांमध्ये वनविभागाच्या सहकार्याने वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. या वेळी अदानी पॉवरचे प्रमुख मयंक दोशी, फाउंडेशनचे प्रमुख बिमूल पटेल जिल्हा परिषद सदस्य किरण भाऊ पारधी कवलेवाडा सरपंच इंदुताई पारधी मेंदीपूर सरपंच धर्मदास चौधरी बरबसपुरा उपसरपंच राजेश परिहार वन विभागाचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते अदानी फाउंडेशन तर्फे चालू वर्षांमध्ये 21000 पेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली आहे व 25000 वृक्षांची लागवड करणे प्रस्तावित आहे.

आरोग्य शिबिर: ७ ऑगस्ट रोजी बिरसी येथे मल्टीस्पेशालिटी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 250 हून अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली यावेळी प्रामुख्याने सरपंच नंदकुमार शरणागत व ग्रामपंचायतचे इतर सदस्य उपस्थित होते.
पशु आरोग्य शिबिर: ८ ऑगस्ट रोजी चिखली गावात कामधेनू प्रकल्पांतर्गत पशुवंधत्व निवारण व आरोग्य शिबिर भरवण्यात आले. यात तज्ञ पशुवैद्यांनी २०० हून अधिक जनावरांची तपासणी करून उपचार केले यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच कैलास भाऊ पटले उपसरपंच व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पशुसंवर्धन विभाग तिरोडा यांचे सहकार्य लाभले.
शालेय सुविधा: खैरबोडी, चुरडी जिल्हा परिषद शाळांमध्ये आणि तिरोडा येथील उत्तर बुनियादी शाळेमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही पार पडला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधुरी राहंडाले, खैरबोडी सरपंच विद्याताई टेंबरे , चूरडी सरपंच सपना ताई इनवते आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

जलशुद्धीकरण यंत्राचे लोकार्पण: ११ ऑगस्ट रोजी करटी खुर्द येथे अदानी फाउंडेशनतर्फे बसवण्यात आलेल्या जलशुद्धीकरण यंत्राचे लोकार्पण करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी आणि पंचायत समिती सदस्य रवींद्र चौधरी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला यावेळी प्रामुख्याने ग्रामपंचायत सरपंच पंजाबराव ऊकुंडे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोबतच ग्रामपंचायत मेहंदीपुर व मरारटोला येथे सुद्धा जलशुद्धीकरण यंत्र लावण्यात आले आहे
अदानी फाउंडेशनचे प्रमुख बिमूल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व उपक्रमांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला, ज्यामुळे हे कार्यक्रम यशस्वी झाले.

Pingback: buy enclomiphene generic overnight shipping
Pingback: medicament kamagra medicament nist prescrire
Pingback: cheap androxal usa online
Pingback: buy flexeril cyclobenzaprine generic next day delivery
Pingback: Buy dutasteride online
Pingback: cheapest buy fildena canada shipping
Pingback: gabapentin online no perscription
Pingback: cheapest buy itraconazole new york city
Pingback: order avodart generic next day delivery
Pingback: how to buy staxyn price in us
Pingback: buy rifaximin generic usa
Pingback: order xifaxan
Pingback: koupit levné kamagra bez lékařského předpisu