Generalमहाराष्ट्

राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाचे सतर्कतेचे आवाहन..!

 

नागपूर प्रतिनिधी :- हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 16 ऑगस्ट पासून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या काही दिवसात मान्सूनचा जोर वाढणार असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची तीव्रता अधिक राहू शकते हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन केलं आहे. विशेषतः शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुरक्षितता बाळगून प्रवास करण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.

शेतकरी बांधवांनी पिकांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी तसेच नदी नाल्याच्या खोऱ्यात किंवा पाण्याच्या प्रवाहात जाणं टाळाव असं सल्ला देण्यात आला आहे. हवामान खात्याचे अंदाजानुसार जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

13 thoughts on “राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाचे सतर्कतेचे आवाहन..!

Comments are closed.