घाटटेमनी येथे वीटभट्टी चालकाची हत्या? घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण..!
गोंदिया :- जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घाटटेमणी गाव शिवारात प्रेत आढळले असून मृतकाची ओळख विनोद केसुलाल देशमुख वय 48 वर्ष राहणार घाटटेम्णी अशी आहे.मृतक हा दिनांक 19 ऑगस्ट च्या रात्रीपासून बेपत्ता होता. तेच दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजे दरम्यान मृतकाचे शव गाव शिवारात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रावणवाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतकास शवविच्छेदनासाठी केटीएस सामान्य रुग्णालय गोंदिया येथे पाठवण्यात आले. या घटनेने गाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घडलेल्या परिस्थितीची दखल घेत रावणवाडी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे.
