केटीएस सामान्य रुग्णालय येथे 10 एप्रिल रोजी जागतिक होमिओपॅथी दिन साजरा
दि. 10 एप्रिल 2023 रोजी जिल्हातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये जागतिक होमिओपॅथी दिन साजरा करण्यात आला. केटीएस सामान्य रुग्णालय अंतर्गत आयुष सेलमध्ये जिल्हा शल्य चिकिस्तरी डॉ. अमरीश मोहबे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, जिल्हा आयुष अधिकार डॉ. मीना वट्टी यांच्या उपस्थितीत जागतिक होमिओपॅथी दिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम सर हँनिमन यांच्या प्रतिमेला माल्यार्पन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी व ऍलोपॅथिक सर्व ही सर्वश्रेष्ट आहेत.प्रत्येक पॅथीमध्ये निदान व त्यानुसार उपचार करणे आवश्यक आहे. होमिओपॅथी दिनानिमित्त डॉ. अमरीश मोहबे यांनी होमिओपॅथी उपचार करून घेण्याचे आवाहन केले तसेच स्वतःहून आयुष पॅथीकडे विद्यार्थ्यांनी सुद्धा रुची घेणे आवश्यक आहे असे मत डॉ. निरंजन अग्रवाल यांनी व्यक्त केले.
मागील 15 वर्षापासून आयुष विभाग ,केटीएस सामान्य रुग्णालय गोंदिया येथे कार्यरत आहेत. या ठिकाणी आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योगा व पंचकर्म असे उपचार व चिकित्सा दिली जाते. आज पर्यंत हजारो रुग्णांनी यापॅथीचा यशस्वी लाभ घेतलेला आहे व पुढेही घेत राहणार अशी माहिती जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मीना वट्टी यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मुकेश येरपुडे तर आभार प्रदर्शन डॉ. महेंद्र संग्रामे यांनी केले.
कार्यक्रमात आयुष विभागाचे डॉ. ममता पिढेकर, होमिओपॅथी तज्ञ डॉ. अर्चना जाधव ,होमिओपॅथी तज्ञ डॉ. शाहींन खान , डॉ. नाहीद कौसर, युनानी तज्ञ डॉ. नीलिमा कुथे, आयुर्वेद चिकित्सक सुनंदा रामटेके, आयुष औषध निर्माण अधिकारी बबीता मेंढे, गर्भ लिंग निदान कार्यक्रमाचे समन्वयक अँड. रेखा कानतोडे,सिकलसेल समन्वयक सपना खंडाईत, जिल्हा आयपीएचएस समन्वयक डॉ स्वर्णरेखा उपाध्याय, साथ रोग तज्ञ डॉ. सुशांत कापसे व राष्ट्रीय आरोग्य अभियान , केटीएस सामान्य रुग्णालय येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.