नाल्याच्या मधोमध पडला पार्सल ट्रक..!
गोंदिया/ देवरी :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरून रायपुर कडून नागपूरकडे जात असताना एक मोठा लॉरी पार्सल ट्रक खडकी बामणी येथील नाल्यावरील पुलाच्या मधोमध सकाळी सहा वाजे दरम्यान पडला. त्या गाडीवर चालक व वाहक दोघेच होते. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे ट्रकचा टायर फुटल्यामुळे ट्रक अनियंत्रित झाला व सदर अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की त्यावेळेला मोठी अनुचित घटना घडू शकली असती. या घटनेच्या निमित्ताने चालकाने गाडीचा रखरखाव व्यवस्थित राखणे अपेक्षित होते. यावेळी देवरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील तपास करत आहे.
