सामाजिक

नवतरुण सार्वजनिक गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम 

अर्जुनी मोर :- 

तालुक्यातील इसापूर येथील नवतरुण सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने गावात श्री गणेशाची स्थापना करून दहा दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून गणेश उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून श्री गणेशाच्या मंडपात गावातील कार्यरत व सेवानिवृत्त झालेले शिक्षकांना बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सेवानिवृत्त शिक्षक मोरेश्वर भावे सेवानिवृत्त प्राचार्य लहुजी बोळणे सेवानिवृत्त प्राचार्य यादवराव चांदेवार सेवानिवृत्त शिक्षक देवराम चांदेवार यांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांचे पूजन करून मल्हारपण करण्यात आले मंडळाच्या वतीने सेवानिवृत्त सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच मंडळाच्या वतीने विविध उपक्रम बक्षीस पत्र विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला दहा दिवसीय या कार्यक्रमा यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष हिरालाल चांदेवार उपाध्यक्ष संतोष रोकडे सचिव रमेश चांदेवार आदींनी सहकार्य केले.