गोंदिया :- राज्य राखीव पोलीस बलगट रामटेकळी पुणे येथे आयोजित २० व्या पोलीस कर्तव्य मेळावा स्पर्धा मध्ये श्वान लुसी अम्ली पदार्थ शोधक हिने कास्य पदक प्राप्त केले बाबद.
माननीय पोलीस अधिक्षक गोंदिया श्री गोरख भामरे साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक श्री अभय डोगरे साहेब यांचे निर्देशाप्रमाणे तसेच पोलीस उपअधिक्षक (मुख्या.) श्री रामदास सेवते साहेब, पो.नि. श्रीमती चांदपुरकर मॅडम व पो.उप.नि. श्री सतीश शिरीया, श्वान पथक गोंदिया यांचे मार्गदर्शन खाली दिनांक १५/०९/२०२५ ते १९/०९/२०२५ पर्यंत राज्य राखीव पोलीस बल गट रामटेकळी पुणे येथे आयोजित २० व्या पोलीस कर्तव्य मेळावा स्पर्धा मध्ये महाराष्ट्रातील नागपुर, पुणे, मुंबई, नाशिक, वर्धा, रत्नागिरी, नवी मुंबई, ठाणे इत्यादी जिल्हायाचे श्वानाचे समावेश झाले असता त्यामध्ये गोंदिया श्वान पथक येथील श्वान लुसी अमली पदार्थ शोधक हिने महाराष्ट्र राज्यात कास्य पदक पटकावला आहे. त्यामध्ये श्वान हस्तक पो.हवा.३९३ श्री विजय ठाकरे, पो.शि.१६३४ श्री मारवाडे यांनी सहभागी होऊन गोंदिया, जिल्हा पोलीस दलाचे नांव गौरान्वित केले आहे. तसेच गडचिरोली परिक्षेत्रामध्ये श्वानाचे दोन पदक आल्याने गडचिरोली परिक्षेत्राला चैम्पियनशिप ट्रॉफी मिळालेली आहे.
