स्वास्थ

प्रा.आ. केंद्र दवनीवाडा येथे आयोडीन न्यूनता विकार प्रतिबंध दिवस साजरा

 

गोंदिया :- मानवास आपल्या आरोग्यासाठी शारिरीक व बौध्दीक वाढ आणि विकासासाठी आयोडीनची अत्यंत गरजेची आहे.आयोडीनची कमतरता आरोग्याला कशी घातक ठरू शकते,याची सर्वसामान्यांना जाणीव करून देण्यासाठी दि.21 ऑक्टोबर रोजी जगभरात जागतिक आयोडीन न्युनता विकार नियंत्रण दिन तसेच 14 ते 28 ऑक्टोबर दरम्यान पंधरवाड्यात आयोडीन बाबत जनजागृती करण्यात येत आहे.

दिनांक 24 ऑक्टोबर रोजी प्राथमिक आरोग्य केन्द्र दवनिवाडा येथे जागतिक आयोडीन न्यूनता विकार प्रतिबंध दिवस वैद्यकीय अधिकारी डॉ.फहीम अख्तर व डॉ.अमर खोब्रागडे यांच्या उपस्थितीत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.त्यात आरोग्य सहाय्यक महेश नागदिवे,आरोग्य सहायिका कल्पना मेश्राम ,आरोग्य सेविका अर्चना हेमने,औषध निर्माण अधिकारी राऊत यांचे सह कार्यक्षेत्रातील आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आशा सेविका व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.सर्वांना 10 घरातील मीठ नमुने तपासणी करून आयोडीनची मात्रा तपासणी बाबत अवगत करुन मार्गदर्शन करण्यात आले.

आयोडीन हे मानवी आरोग्यासाठी एक महत्त्वाचे अत्यंत महत्त्वाचे मायक्रोन्यूट्रियंट आहे जे की शारीरिक आणि मानसिक वाढ चांगली होण्यासाठी आवश्यक आहे.मुख्यत्वे गरोदरपणातील तीन महिन्यापासून ते वयाच्या तीन वर्षापर्यंत मेंदूच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.फहीम अख्तर यांनी सांगितले.आयोडीनची कमतरता हे एक मतिमंदत्व व मेंदूचे नुकसान चे प्रमुख कारण असून यामुळे फक्त गलगंडच होत नाही तर अनेक प्रकारचे विकार होण्याची कारणीभूत आहे.विशेषतः सहा ते बारा वर्षे वयोगटातील मुलांचे शैक्षणिक अध्ययन क्षमता,महिलांच्या आरोग्य,सामाजिक जीवन आणि आर्थिक उत्पादितेवर याचा थेट परिणाम होत असल्याची माहीती डॉ.अमर खोब्रागडे यांनी यावेळी दिली.