साहित्य

अ.भा. मातोश्री जिजाऊ साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून प्रख्यात लेखक रवी दलाल यांची निवड

 

गोंदिया :- विदर्भातील प्रख्यात लेखक, कवी, कादंबरीकार रवी दलाल यांची गोंदिया येथे होणारे तिसऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे.

अमरावती जिल्ह्यातील मुळ तिवसा गावचे रहिवासी असून सध्या काटोल येथील रहिवासी आहेत. आपल्या प्रखर लेखणीच्या साह्याने अनेकांच्या हृदयावर राज्य करणारे लेखक यांच्या अनेक कादंबऱ्या, कवितासंग्रह लेखसंग्रह,कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत.

300 वर्षापासून विदर्भात

अलिखित स्वरुपात असलेले अवधुती भजन यावर रवी दलाल यांनी प्रथम लेखणी उचलली आणि पंरपरेनुसार अलिखित अवधूती भजन लिहून काढले. अवधूती भजन बौद्ध धर्मातील प्रवाह, हे अत्यंत गाजलेल्या पुस्तका पैकी आहे.अवधूती भजन खंडातून प्रकाशित करुन अवधुती भजन लेखी स्वरूपात आणणारे रवी दलाल हे पहिले लेखक आहेत.

नामा, बेगळ,उलटी सावली,आठवणीतले दिवस,पारध मोवाडचा महापुर,अश्या अनेक कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाचे अध्यक्ष निर्माता दिग्दर्शक राज कुबेर हे “नामा” कादंबरीवर मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहे. सत्य घटनेवर आधारित असलेली बहुचर्चित “पारध” कादंबरी कांशीराम यांच्या हस्ते प्रकाशित झाली असून कादंबरीला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आहे. रवी दलाल हे मराठी चित्रपट महामंडळाचे सभासद आहेत .आजपर्यंत मोठ- मोठ्या पुरस्काराने सन्मानित झालेले प्रसिद्ध लेखकापैकी आहेत. पाच देशातून मिळणारा आंतरराष्ट्रीय “रॉक्स” पुरस्कार रवी दलाल यांच्या दंगल कथासंग्रहाला मिळालेला आहे हे विशेष .

दि 10/12/2025 रोजी दिल्ली (नवीन) महाराष्ट्र सदन भवन येथून मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण समितीकडून जाहीर झालेला शासनाचा समाजरत्न पुरस्कार नाकारणारे हे एकमेव साहित्यिक असून आपल्या विचारावर ठाम असणारे विद्रोही साहित्यिक आहेत.

जे. एन.यु.जवाहरलाल नेहरू इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी दिल्ली मध्ये “बेगळ” कादंबरीचा पुस्तक गॅलरीत समावेश, “नामा” कादंबरीची अभ्यासक्रमासाठी निवड. उलटी सावली,वेदनेचा वेद, वेलांटी, खपलेलाची पायवाट इत्यादी, कथासंग्रह प्रकाशित कानु सोनू व महार पारडीचा इतिहास,सावजी चाळ, शंकरपट, आठवणीतले दिवस, आभाळव्रण,दंगल, पुरणपोळी मास्तर,धाडसी दरोडा इ.साहित्य कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत.

रवी दलाल हे नाव फक्त साहित्य क्षेत्रातच नावलौकिक नसून सामाजिक,शैक्षणीक क्षेत्रात सुद्धा उतुंग भरारी घेणारे साहित्यिक आहेत. वर्धा जिल्ह्यातील चार राधाबाई दलाल नर्सिंग कॉलेज संचालक असुन अनेक निवड मंडळावर अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. 1990 पासून बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते कांशीराम यांचे सहकारी व बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आजही कार्यरत आहेत.