संविधान दिन युनायटेड कॉन्व्हेंट, ठाणा (पे.प.)येथे मोठया उत्साहात संपन्न..!
आठवी ते दहावी च्या मुलींनी लेझीम वर खुप सुंदर नृत्य सादर केले. सर्व उपस्थित गावकर्यांनी लेझीम नृत्यची प्रसंसा केली.विविध प्रकारचे संविधान प्रबोधन गीत, ड्रामा, एकांकिका, नृत्य सादर केले. याप्रसंगी एक आकर्षणाचा केंद्र बिंदू होता तॊ म्हणजे तिसरी ते सहावी च्या विध्यार्थीची मार्चपासिंग, ते NCC च्या ड्रेस मध्ये रैली मार्चपासिंग करून सर्वांचे मन मोहत होते. त्या ड्रेस मध्ये खुप सुंदर दिसत होते.

रैलीची सांगता शाळेत झाली त्याप्रसंगी शाळेतील सर्व विध्यार्थी, शिक्षक व शिक षोत्तर कर्मचारी यांनी DJ च्या तालावर डान्स करून संविधान दिनाच्या आनंद साजरा केला. संविधान दिन साजरा करण्यासाठी शाळेतील सुपरीटेंडंट मंगेश गजभिये, लेखचंद रुषेशरी, म्युझिक टीचर बावणे, सोनाली दहिवले, धरमचारे मॅम,सुशिला हटवार मॅम,मोश्मी नंदेश्वर, वंदना थापा, अंकिता नंदेश्वर, विजया उके, प्रफुल्ला रोडगे, स्वाती सत्या, कृतिका थापा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांचप्रमाणे शाळेचे शिक्षषोत्तर कर्मचारी चेतना देव्हारे, संगीता चोपकर, सोनाली वानखेडे,काजल दोरखेडे यांचे मोलांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन शाळेची संस्कृती प्रमुख अग्रणी राकेश गजभिये आणि साहिल गोपाल दंडारे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र तिजारे यांनी केले. रैली सुरडीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोलांची कामगिरी बजावली.
