विदर्भशैक्षणिक

परीक्षेपूर्वीच सुट्ट्या जाहीर,शिक्षणाधिकाऱ्याचे वेळापत्रक फसले!

गोंदिया:- शालेय अभ्यासक्रमाचे अभ्यास करुन वर्ष अखेरीस परीक्षेचा काळ हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनातील अतिशय मोलाचा ठरतो, मात्र गोंदिया जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवी, नववी व अकरावी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनात सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. त्यात घडले असे की, शिक्षणाधिकारी माध्यमिक कादर शेख यांनी 31 मार्च रोजी जाहीर केलेल्या पत्रानुसार दिनांक 17 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा वेळापत्रक जाहीर केले. यानुसार दिनांक 20 एप्रिल पर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीतपणे पार पडत होत्या दरम्यान शिक्षण संचालक कार्यालय पुणे येथून निर्गमित झालेल्या पत्राची तात्काळ दखल घेत शिक्षणाधिकाऱ्याने लगेच दिनांक 21 रोजी विशेष प्रभावाने जाहीर केल्या त्यामुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या की काय? असा प्रश्न निर्माण होतो. या निर्णयानुसार जर परीक्षा परिपूर्ण झाल्या नसतील तर त्याचे परिणाम कसे घोषित करणार. तसेच येत्या नऊ मे ला विद्यार्थ्यांना निकाल पत्रक मिळणार की नाही याबाबत पालकांच्या मनात संभ्रम निर्माण आहे. जिल्ह्यातील काही माध्यमिक मुख्याध्यापकांच्या मतानुसार यापुर्वी असे वेळापत्रक पाहिलेच नाही असे मत व्यक्त केले. याविषयी शिक्षण अधिकारी माध्यमिक यांच्याशी संपर्क केला असता ” मी मीटिंगमध्ये आहे याविषयी नंतर बोलतो असे सांगितले” हे वेळापत्रक प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांच्या परीक्षेसाठी जाहीर करण्यात आले हे विशेष. याविषयी शासन कोणती कारवाई करणार याकडे जनसामान्यांचे लक्ष लागून आहे.