सामाजिक

कलारीटोला येथील पोलीस पाटीलच्या गैरहजेरीमुळे ग्रामीण नागरिक त्रस्त..! 

गोंदिया :- गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका निभावणारा दुवा म्हणजे पोलीस पाटील. गावात राहून नागरिकांच्या अडचणींना हातभार लावण्यासाठी शासनाने त्याची नियुक्ती केली आहे. स्थानिक नागरिकांना अनेक शासकीय कामांसाठी विविध स्तरावरील दाखले तसेच होत असलेल्या भांडण तंट्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते. ही सर्व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटलाने गावात राहणे हे अत्यंत गरजेचे आहे मात्र काही ठिकाणी विपरीत परिस्थिती दिसून येते. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार ग्राम कलारी टोला तालुका गोंदिया येथील पोलीस पाटील हे गावात न राहता गोंदियात राहत असल्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांना वेळेवर संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, रहिवासीचे दाखले आदी कागदपत्रांवर घरच्या नातेवाईकाकडे कोऱ्या दाखल्यावरच सह्या करून ठेवणे अशी परिस्थिती मागील अनेक वर्षापासून असल्यामुळे तेथील जनता ही त्रस्त झाली आहे. तसेच भांडण तंटातही अनेकदा अनुपस्थित असल्यामुळे आपली कामगिरी बजावत नसल्याच्या कारणामुळे जनतेने आंदोलनात्मक पवित्रा घेण्याची तयारी दाखविली आहे.