Generalगुन्हेगारी बातमी

बदल्याच्या भावनेने युवकाचा तलवारीने केला खून..! 

गोरेगाव :- जुन्या वैमानस्यातून एका युवकाचा तलवारीने घाव घालून खून करण्यात आला. ही घटना ( दि. 16) रात्री आठ वाजेच्या सुमारास हेटी पालीवाडा येथे घडली. देवेंद्र चुनीलाल ताराम वय 27 राहणार हेटी असे मृतकाचे नाव आहे. या घटनेतील आरोपी सुनील कांबळे वय 25 राहणार हेटी याने पोलीस पाटील परिमल ठाकूर यांच्याकडे तलवारीसह आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र ताराम याने काही महिन्यापूर्वी सुनील कांबळे यांच्या वडिलांचा खून केला होता. खूणाच्या आरोपाखाली देवेंद्र ताराम हा भंडारा येथील कारागृहात शिक्षा भोगत होता. फेब्रुवारी महिन्यात त्याला जामीन मिळाल्याने तो तुरुंगातून सुटून हैदराबाद येथे गेला होता. दरम्यान सोमवारी (दि. 16) रोजी सायंकाळी तो हेटी येथे आला होता. याच दरम्यान जुन्या वयमनस्यातून आरोपी सुनील कांबळे व त्याच्या साथीदारांनी देवेंद्रचा पाठलाग करून तलवारीचे अनेक घाव घालत त्याचा खून केला. घटनेनंतर आरोपी सुनील कांबळे यांनी पोलीस पाटील परिमल ठाकूर याचे कडे जाऊन तलवारीसह आत्मसमर्पण केले . पोलीस पाटलांनी तात्काळ गोरेगाव पोलिसात तक्रार दाखल केली यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे व त्यांच्या फॉरेनची चमूने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत आरोपीस अटक केली. या घटनेची नोंद पोलिसांनी केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बीटमलदार तुंबडाम व सहकारी पोलीस करीत आहेत.

 

दुसरा आरोपी ताब्यात मंगळवार (दि. 17) रोजी पोलिसांनी तपासा दरम्यान आरोपी सुनील कांबळे