Generalगुन्हेगारी बातमी

दोन लाखाचा गांजा केला जप्त

गोंदिया :- शहरात अमली पदार्थ विक्रीच्या प्रतिस्पर्धे वरून झालेल्या खुनाच्या खटल्याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिलेल्या विशेष आदेशानुसार अमली पदार्थाच्या तस्करीवर सक्तीने कारवाई करण्याची घटना (दि 25) रात्री 8.30 वाजता डांगुर्ली येथील वैनगंगा नदीच्या पुलावर बालाघाट कडून गोंदियाकडे येताना आरोपी ऋषभ उर्फ निशांक खेमेंद्र लिल्हारे (21) राहणार नर्मदा नगर बालाघाट हा दुचाकी क्रमांक mp 50/5872 वर बोरीमध्ये भरून गांजाची वाहतूक करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूला सापडला. त्यामध्ये 11 किलो ओलसर गांजा असल्याची खात्री पटल्यावर आरोपीला अटक करून पोलीस स्टेशन रावणवाडी येथे सुपूर्द केले. या कार्यवाहीत दुचाकी 55 हजार रुपये किमतीची असून दीड लाख रुपये किमतीचा गांजा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशानीं 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.