ट्रॅक्टरच्या धडकेत ड्रायव्हरचा मृत्यू
गोंदिया:- पोलीस स्टेशन रावणवाडीच्या हद्दीत येणारे ग्राम चारगाव येथे (दि.8)रोजी हनुमान मंदिर चौक येथे सायंकाळी 7.45 वाजे दरम्यान ट्रॅक्टर क्र.MH35 AJ1256 यातील चालकाने हयगयीने वाहन चालविल्यामुळे रस्तालगत उभे असलेल्या मृतक प्रेमलाल हरिचंद पंधरे (45) राहणार चारगाव यास ट्रॅक्टरच्या मागच्या साहित्याने दिलेल्या धडकेत मृतकाच्या पोटावरील भागाला जबर दुखापत झाल्याने तो घटनास्थळी कोलमडून पडला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरातील शेजाऱ्यांनी लगेच युनायटेड हॉस्पिटल गोंदिया येथे त्याला भरती केले मात्र रात्री साडेअकरा वाजे दरम्यान डॉक्टरांनी पीडिताला मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर अंत्यसंस्कार
करण्यात आले. मृतकाचे चारचाकी वाहनाचे व्यवसाय होते मृतक हा मिलनसार व्यक्तित्व असून त्याच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मृतकाच्या परिवारात पत्नी व तीन मुले आहेत. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर चालक हा घटनास्थळापासून नजीकच सुरूअसलेल्या दारू दुकानातून दारू पिऊन आपल्या धुंदीत हयगईने ट्रॅक्टर चालवून घटनेला कारणीभूत ठरला. नशेमध्ये वाहन चालवणे हा गुन्हा आहे व त्याच्या निर्मूलनासाठी अनेक कायदे आहेत मात्र यंत्रणेला त्यावर कारवाई करण्यासाठी वेळ नसल्याने समाजातील अनेक निष्पाप लोकांचे बळी जाऊन त्यांचे परिवार उध्वस्त होत आहेत. या घटनेचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जिम्मेदार कोण? असा सवाल ग्रामीण जनता विचारत आहे.अनेक लोकप्रतिनिधी व यंत्रणा याविषयी किती गंभीर आहेत हे या प्रकरणावरून सहज लक्षात येते. तेव्हा यापुढेही या विषयावर काही सुधारणा होणार की काय हे येणारा काळच ठरवेल. याप्रकरणी रावणवाडी पोलिसांनी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार अ. क्र.172/23 कलम भादवी 279,304 अ,184 मो. वा. का. अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास एपीआय बाबासाहेब सरवदे करत आहेत.