General

गांजा तस्करीतील आरोपी फरार


गोंदिया :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक महेश जयराम विघ्ने यांनी केलेल्या कारवाईत (दि.26/3/2023)रोजी अवैधरित्या दहा किलो 180 ग्रॅम हिरवा रंगाचा ओलसर गांजा 1,52,700/-रु किमतीच्या व 55000/- रु मोटरसायकल क्रमांक एमपी 50, एमपी 58 72 असे एकूण दोन लाख सात हजार 700 रुपये किमतीचे मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आले होते. यातील आरोपी क्र.1) ऋषभ उर्फ निशांक खेमेंद्र लिल्हारे, (21) राहणार नर्मदा नगर बालाघाट मध्यप्रदेश मूळ पत्ता डोंगरमाली तालुका वाराशिवनी जिल्हा बालाघाट विरुद्ध पोलीस स्टेशन रावणवाडी येथे अप. क्र.133/2023 कलम -8(क),20,29 एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा नोंद असून तपासात आहे याच गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 2) सुरेश उर्फ गुड्डू खेमचंद मस्करे (37) राहणार डोंगरमाली तालुका वाराशिवनी जिल्हा बालाघाट मध्य प्रदेश हा घटनेच्या तारखेपासून फरार आहे. सदर आरोपी कोणत्याही व्यक्तीला आढळून आल्यास तात्काळ त्याची माहिती पोलीस स्टेशन रावणवाडीला देण्याची अपील तपास अधिकारी सोपोनी बाबासाहेब सर्वदे यांनी केली आहे.