मुख्याध्यापकांनी चार वाजताच ठोकला शाळेला कुलूप!
गोंदिया :- पावसाळ्याच्या दिवसात अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाणे म्हणजे जीवावर बेतल्यासारखा आहे मात्र शिक्षकही याच तालावर नाचू लागले तर बोलायला आणखी काय उरणार…?अशीच एक घटना गोंदिया तालुक्यातील चिरामनटोला येथील जिल्हा परिषद शाळेत घडली. तेथील मुख्याध्यापकांनी दिनांक 12 जुलै रोजी दुपारी चार वाजता शाळेला कुलूप ठोकला व विद्यार्थ्यांना स्वगृही पाठवले. याविषयी मुख्याध्यापकांशी बोलणी केली असता त्यांनी कबुली जवाब दिला. या मुख्याध्यापकांना गेली अनेक वर्षे विद्या दान करण्याचा अनुभव आहे. तरीदेखील त्यांना समय सूचकतेचा विसर पडला की काय असा सवाल तेथील पालक वर्ग करत आहे. ठरलेल्या वेळेनुसार अकरा ते पाच या वेळेत विद्यार्थ्यांची जिम्मेदारी हे शिक्षकांवर रहाते. मात्र कारण नसताना लवकर सुट्टी देणे हे कुठेही तर्कसांगत दिसत नाही. याविषयी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई करु असे आश्वासन दिले. विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये शिक्षक अनेकदा विविध कारणे दाखवून सतत गैरहजर राहात असल्याचे अनेक प्रसंग दिसून येतील. अशा घटना वारंवार का घडत असाव्यात याचे अवलोकन होणे गरजेचे आहे. एकीकडे शिक्षक आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतो तो त्यांचा हक्क आहे त्याचे कधीही समर्थनच, दुसरीकडे आपल्या कर्तव्यात कसुरी करून कामचुकारपणा करणाऱ्या शिक्षकांवर कडक कारवाई का करण्यात येऊ नये अशी मागणी पालकांच्या समूहाने केली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शाळा शिक्षण समिती पासून वरपर्यंत लांबलचक साखळी आहे मात्र प्रशासनाच्या उदासीनते मुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण कसे धोक्यात आहे हे या घटनेतून सहज लक्षात येते. शासन आपल्या बजेटमध्ये शिक्षणासाठी अपेक्षित तरतूद न करता आपली उदासीनता थेट जाहीर करतो त्यातच प्रशासन सुद्धा आपले हात वर करायला मागे राहत नाही असेच चित्र या निमित्ताने पुढे येत आहे. अशा प्रकरणात कारवाईच्या नावावर होत असणाऱ्या पॉकेट प्रकरणांची चर्चा सगळीकडे आहे व प्रशासनाचा धाक नसल्याने शिक्षकही नियमबाह्यपणे पळवाटा काढत मनमुराद आनंद लुटण्याच्या तयारीत असतात असे निदर्शनास येते. ग्रामीण भागात प्रज्ञावंत,सजग, सुदृढ व कर्तव्यनिष्ठ विद्यार्थी घडेल का याबाबतीत शंका उपस्थित केली जात आहे. या प्रकरणावर गटशिक्षणाधिकारी काय कारवाई करतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत.बघूया….क्रमशः